, , ,

वेबकॅम नसतानाही करा व्हिडीओ चॅट...

November 21, 2008 Leave a Comment


जी-मेलने गेल्या आठवड्यात व्हिडीओ अाणि व्हॉईस चॅट हे नवे फीचर सुरू केले. यापूवर्वी व्हॉईस चॅटसाठी जी-टॉक हे अॅप्लीकेशन वापरावे लागत असे. व्हिडीओ चॅटसाठी तुम्ही स्काईप किंवा याहू मेसेंजर वापरत असाल. पण थेट ई-मेलमध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस चॅट इंटिग्रेट करून गुगलने या प्रचलित सेवांसमोर जबरदस्त स्पधर्धा निमर्माण केली आहे. तुमच्यापैकी अनेकांनी जी-मेलची ही नवी सेवा वापरून पाहिली असेलच. काय म्हणता? तुम्ही अजून ही सेवा वापरलेली नाही? का? वेबकॅम नाही म्हणून? फिकर नॉट...साधी-सोपी टेक्नॉलॉजी नियमित वाचणाऱ्यांना ही अडचण आलीच नसेल. अॉगस्टमध्ये लिहिलेल्या एका पोस्टमध्ये मोबाईल कॅमेऱ्याला वेबकॅममध्ये रुपांतरित करणाऱ्या वीगो (वेबकॅम व्हेरेवर आय गो) या सेवेबद्दल मी माहिती दिली होती. ती पोस्ट तुमच्याकडून मिस झाली असल्यास, पुन्हा एकदा वाचा (मेरे पास 'वीगो' है) आणि जी-मेलच्या नव्या सेवेचा आनंद घ्या. याच पद्धतीने तुम्ही स्काईप, याहू मेसेंजर आणि विंडोज लाईव्ह मेसेंजर वापरूनदेखील व्हिडीओ चॅट करू शकता.

त्यापूवर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याः
१. जी-मेल व्हिडीओ आणि व्हॉईस चॅटसाठी एक छोटेसे अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागते. ते अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. फुलस्क्रीन व्हिडीओ चॅटसाठी तुम्हाला तुमचे फ्लॅश व्हर्जन अपडेट करावे लागेल.
३. कॉम्प्युटर रिस्टार्ट करा.
४. वीगो हे अॅप्लीकेशन केवळ नोकियाच्या सिरीज ६० (व्हर्जन २.० आणि ३.०) हॅंडसेट्सवर वापरता येते. कम्पॅटिबल हॅंडसेट्सच्या यादीसाठी येथे क्लिक करा.
५. वीगोचे डेस्कटॉप अॅप्लीकेश विंडोज एक्सपीवर वापरता येते. ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
६. इन्स्टॉल करण्याआधी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईलचे ब्लुटूथ अॉन करा.
७. डेस्कटॉप अॅप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातूनच एक .sis फाईल मोबाईलवर पाठवली जाते. त्यासाठी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईल पेअर्ड असल्याची खात्री करा. .sis फाईल मोबाईलवर इन्स्टॉल करा.
८. दोन्हीकडील अॅप्लीकेशन्स रन करा. मोबाईलवर अॉप्शन्समध्ये जाऊन कनेक्ट म्हटल्यानंतर डेस्कटॉप/लॅपटॉपवर व्हिडीओ दिसू लागेल.
९. आता तुम्ही जी-मेल चॅटमध्ये गेल्यास तुमच्या नावासमोर व्हिडीओ आयकॉन दिसू लागेल.
१०. एन्जॉय जी-मेल व्हिडीओ चॅट!

Related Posts :0 comments »