,

ब्लुटूथ चॅटिंगचा जनकः प्लीक्स

November 22, 2008 Leave a Comment


तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व कॉन्टॅक्ट्सचा बॅक-अप तुमच्याकडे आहे?
- हो
तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या इमेजेस, व्हिडीओज, डॉक्युमेंट्सचा बॅक-अप तुमच्याकडे आहे?
- अं...नाही
तुम्ही ब्लुटूथ वापरून कधी चॅटिंग केलं आहे?

- असं करता येतं?
तुम्ही ठेवलेल्या बॅक-अपसाठी आणि पाठवलेल्या मेसेजेससाठी कधी कुणी तुम्हाला गिफ्ट दिलं आहे?
छे...काय वेड लागलंय का? फुकट सेवा वापरायची आणि वर गिफ्टची अपेक्षा ठेवायची?

अशी सेवा कुणी देऊ केली तर तुम्ही वापराल?

पॅरिसस्थित मेग्लिन सॉफ्टवेअर या कंपनीने डेव्हलप केलेली प्लीक्स ही सेवा पारंपरिक ओव्हर-द-एअर (ओटीए) मोबाईल डेटा बॅक-अपहून अत्यंत निराळी आहे. तुम्ही मोबीकॉल किंवा झिबसारखी (वाचाः बॅक-अप युवर मोबाईल कन्टेन्ट) सेवा वापरत असाल, तर तुम्हाला प्लीक्सचे वेगळेपण जाणवेल. मोबीकॉल किंवा झिब या सेवांचे मोबाईल अॅप्लीकेशन उपलब्ध नाही. प्लीक्सचे मोबाईल अॅप्लीकेशन सुमारे २००० मोबाईल हॅंडसेटमध्ये वापरता येते. हा प्लीक्सचा सवर्वांत मोठा फायदा आहे. मोबाईल अॅप्लीकेशनमुळे सिंक्रोनायझेशनसाठी लागणाऱ्या सेटिंग्जच्या भानगडीत पडण्याची गरज उरत नाही. मोबीकॉल आणि झिबमध्येदेखील सेटिंग्ज मिळविताना अडचण येत नाही, परंतु त्यांच्या सेटिंग्ज सर्व हॅंडसेटसाठी उपलब्ध नसल्यामुळे काहीवेळा तुमच्या हॅंडसेटच्या फॅमिलीतील एखाद्या हॅंडसेटनुसार सेटिंग्ज मॅन्युअली एंटर कराव्या लागता.

प्लीक्स वापरण्यासाठी जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाईलवर प्लीक्स डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये http://en.pleex.com असे टाईप करा. अॅप्लीकेशन इन्स्टॉल करण्यापूवर्वी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यास केवळ १० ते १५ सेकंद लागतात. नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, बर्थडेट आदी माहिती दिल्यानंतर तुम्ही अॅप्लीकेशन डाऊनलोड करू शकता.

प्लीक्सचा वापर करून तुम्ही खालील गोष्टी करू शकताः

कॉन्टॅक्ट्स बॅक-अपः प्लीक्स ओपन केल्यानंतर त्यातील सिंक्रोनाईझ युवर अॅड्रेस बुक यावर क्लिक करा. बॅक-अप आणि रिस्टोर असे दोन अॉप्शन्स दिसतील. पहिल्यांदा प्लीक्स वापरताना बॅक-अपवर क्लिक करा. काही क्षणांत तुमचे कॉन्टॅक्ट्स अॉनलाईन स्टोअर होतील. हॅंडसेट चेंज केल्यास त्यावर आधी प्लीक्स डाऊनलोड करून तुमच्या नावाने लॉग-इन व्हा व रिस्टोर म्हणा.
फाईल्स बॅक-अपः तुमच्या मोबाईल फोनमध्ये व मेमरी कार्डमध्ये असणाऱ्या सर्व फाईल्स तुम्ही प्लीक्स अॉनलाईनवर स्टोअर करू शकता. प्लीक्स डॉट कॉमवरून तुम्ही या फाईल्स अॅक्सेस करू शकता. फ्लिकर किंवा ब्लॉगरवर थेट अपलोड करणेही शक्य आहे.
प्रोफाईल्स अॅंड फ्री चॅटः ब्लुटूथ नेटवर्किंग हा नवा प्रकार प्लीक्सने डेव्हलप केला आहे. याहू चॅटरूम प्रमाणे यात तुम्ही तुमच्या आवडीची चॅटरूम निवडून तुमचे प्रोफाईल तयार करू शकता. याखेरीज प्लीक्स वापरणारी एखादी दुसरी व्यक्ती तुमच्या जवळ असेल तर तुम्ही ब्लुटूथच्या आधारे चॅटही करू शकता. उदा. एखाद्या मिटींगमध्ये पैसे खर्च करून मेसेजेस पाठवण्यापेक्षा ब्लुटूथ चॅट अधिक उत्तम! जीपीआरएसचा प्लॅन मात्र अनलिमिटेड हवा.
सेन्ड मेसेजेसः प्लीक्सचा वापर करून कोणत्याही मोबाईलवर एसएमएस पाठवू शकता. म्हणजे प्लीक्स सुरू असताना एसएमएस करावयाचा असेल तर मेसेजेसमध्ये जाण्याची गरज नाही. यातून पाठवलेल्या एसएमएसमध्ये एका ओळीची जाहिरात असते.
गेट गिफ्ट्सः प्लीक्सवरील प्रत्येक अॅक्टिव्हिटीसाठी तुम्हाला काही पॉईंट्स मिळतात. उदा. प्लीक्स डाऊनलोड केल्यानंतर १०० पॉईंट्स, कॉन्टॅक्ट्सचा बॅक-अप घेतल्यानंतर १० पॉईंट्स वगैरे. या पॉईंट्सना प्लीक्सो असे म्हटले जाते. या प्लीक्सोजचा वापर करून तुम्ही मोबाईल वॉलपेपर्स, रिंगटोन्स आदी गोष्टी डाऊनलोड करून घेऊ शकता.

Related Posts :0 comments »