फ्रेश जी-मेल

November 20, 2008 Leave a Comment

गेल्या आठवड्यात व्हिडीओ चॅट लॉंच केल्यानंतर आता या आठवड्यात जी-मेलने थीम्सची घोषणा केली आहे. अॉरकुट वापरणाऱ्यांनी थीम चेंजचा अनुभव घेतला असेलच. त्याच धतर्तीवर जी-मेलने काल रात्री थीमची अधिकृत घोषणा केली. यापूवर्वी ग्रीसमंकी एक्स्टेंशन वापरून जी-मेलचा लूक बदलावा लागत असे. आता मात्र जी-मेल सेटिंग्जमध्येच थीम्स असा अॉप्शन उपलब्ध होणार आहे. सुरवातीला जी-मेलने ३० थीम्स उपलब्ध करून िदल्या असून यात क्रोम, नेचर, नोटबुक, रेन आदींचा समावेश आहे.ही सुविधा टप्प्याटप्प्याने सर्व जी-मेलधारकांसाठी अॅक्टिव्ह होणार असून येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे जी-मेलच्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे. माझ्या अकाऊंटवर अद्याप ही सुविधा अॅक्टिव्ह झालेली नाही. तुमच्या अकाऊंटवर झाली असल्यास कृपया आपला अनुभव येथे शेअर करा.
जी-मेलच्या डिफॉल्ट लूकमध्येदेखील किरकोळ सुधारणा केल्याचे या ब्लॉगवर म्हटले आहे.
अपडेटः
ब्लॉगर गणेशने Zoozimp ही थीम सजेस्ट केली आहे.
ब्लॉगर अभिजीतने Desk ही थीम सजेस्ट केली आहे.
तुम्हीही तुमचे सजेशन देऊ शकता.

Related Posts :2 comments »

 • Veerendra said:  

  hi amit .. मी तुमचा ब्लॉग माझ्या "ब्लॉग" या विषयाच्या post मधे पहावे असे ब्लॊग या शीर्षकाखाली जोडला आहे. एक नजर टाकावी.

  :)

 • Amit Tekale said:  

  Thanks Veerendra!
  Nice to meet you in my office...
  Your blog is also good one to read!

  Keep reading my blog for more.

  Amit