,

एस्केप फ्रॉम पीडीएफ

November 20, 2008 Leave a Comment

स्पधर्धेत भाग घेण्यासाठीचे किंवा स्पधर्धा परीक्षेसाठीचे अर्ज आता अॉनलाईन उपलब्ध असतात; पण शेवटी ते डाऊनलोड करून हाताने भरावे लागतात. एखादी चूक झाली की पुन्हा प्रिंट काढा आणि पहिल्यापासून भरा...असे कार्यक्रम होतात. काही वेळा वाटते की भारतातली विद्यापीठे केवळ नावाला अॉनलाईन झालीयेत - प्रोसेसेस सगळ्या अॉफलाईनच असतात. वेबसाईटवर पीडीएफ डाऊनलोडसाठी ठेवले की विद्यापीठातील प्रवेशप्रक्रिया अॉनलाईन होणार, अशा बातम्या येण्यास सुरवात होते. असो. ही परिस्थिती सुधारण्यास आणखी काही वर्षे तरी किमान लागतील. तोपर्यंत असे पीडीएफ फॉर्म अॉनलाईन कसे भरता येतील, याविषयीच्या काही सेवांबद्दलची माहिती करून घ्या.


पीडीएफ फॉर्म एडिटर किंवा पीडीएफ फॉर्म फिलर या कॅटेगरीतल्या अनेक सेवा अॉफलाईन तसेच अॉनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. यातील बहुतांश सेवा पेड अाहेत. या पोस्टमध्ये मी मोफत सेवांबद्दल माहिती देणार आहे

पीडीएफ एस्केपः पीडीएफ फाईल्स एडिट करण्यासाठी किंवा पीडीएफ फॉर्म भरण्यासाठी पीडीएफ एस्केप ही अॉनलाईन सेवा तुम्ही वापरू शकता. कॉम्प्युटरवर स्टोअर केलेली किंवा इंटरनेटवरील फाईल पीडीएफ एस्केपमध्ये अपलोड केल्यानंतर तुम्ही हवे ते बदल त्यात करू शकता. उदा. एखादी ओळ किंवा एखादा पॅराग्राफ अॅड करणे, पानांचा क्रम बदलणे किंवा एखादे पान डिलीट करणे, वेबलिंक्स अॅड करणे आदी बदल करणे शक्य होते. फॉर्म स्वरूपातील पीडीएफ फाईल अपलोड केल्यानंतर त्यातील फॉर्म फिल्ड्स फिकट निळ्या रंगात डिस्प्ले होतात.



त्यावर कर्सर नेऊन तुम्ही थेट त्या फिल्डमध्ये संबंधित माहिती भरू शकता. जेंडर, मॅरिटल स्टेटस आदींसारख्या फिल्डमध्ये क्लिक केल्यास चेकमार्क्स येतात. फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही तो सेव्ह करून डाऊनलोड करू शकता. ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही.
पीडीएफ फिलरः पीडीएफ एस्केपसारखीच ही सेवा आहे. या सेवेचा इंटरफेस अधिक सोपा आणि सुटसुटीत आहे. ही सेवा वापरून फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. रजिस्टर्ड मेंबर्स फॉर्म ई-मेल िकंवा फॅक्सही करू शकतात.

तुम्हाला या कॅटेगरीतील आणखी काही सेवा माहित आहेत? असल्यास साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांसोबत नक्की शेअर करा.

Related Posts :



0 comments »