,

िंपग फॉर इव्हेंट!

December 3, 2008 Leave a Comment

मुलाचा पहिला वाढदिवस शैलेशने जोरदार साजर करायचा ठरविला. हॉटेल बुक केले, निमंत्रितांची यादी तयार झाली, सगळं काही व्यवस्थित झालं. पण निमंत्रण पत्रिकात प्रचंड घोळ झाले. डिझायनरने केलेल्या चुका सुधारण्यात दिवस गेला, त्यानंतर प्रिंटरने घोळ घातले. त्यामुळे अध्यर्ध्या छापून झाल्यानंतर पुन्हा छापावयास घेतल्या. त्यात एक दिवस महाराष्ट्र बंद असल्यामुळे पत्रिका हातात मिळावयासच बुधवार उजाडला. कार्यक्रम दोन दिवसांवर आला असल्यामुळे सगळ्यांना घरी जाऊन पत्रिका देणे शक्यच नव्हते. शेवटी सगळ्यांना फोनवरच आमंत्रण दिले. त्यामुळे प्रत्येकाला हॉटेलचा पत्ता सांगणे, वेळ सांगणे, अडचण आल्यास भावाच्या मोबाईलवर फोन करावयास सांगणे, त्याचा नंबर देणे अशी सगळी माहिती द्यावी लागत होती. शेवटी एकदाचा कार्यक्रम पार पडला...पिंग वापरले असते, तर असे घोळ झाले नसते. पिंग? व्हॉट इज पिंग?



इव्हेंट इन्फॉर्मेशन आणि इन्व्हिटेशनसाठी अनेक अॉनलाईन सेवा उपलब्ध आहेत. अगदी अॉरकुट, फेसबुकचा वापर करूनही तुम्ही एखाद्या इव्हेंटचे इन्व्हाईट पाठवू शकता. पण त्यात ओलावा नसतो. सॉफिस्टिकेशन नसते. सध्या उपलब्ध असणाऱ्या अनेक सेवांमध्ये पिंग ही सेवा सवर्वोत्तम आहे. पिंग या मोफत सेवाचा वापर करून तुम्ही पुढील गोष्टी करू शकताः
१. इन्व्हिटेशन कार्ड डिझाईनः उपलब्ध असलेल्या अनेक डिझाईन्समधून तुम्ही एखादे डिझाईन निवडू शकता किंवा तुम्ही स्वतः केलेले डिझाईन अपलोड करू शकता. पिंगचे प्रीमियम डिझाईन वापरायचे असल्यास १० डॉलर खर्च येईल. कार्डचा ले-आऊटही हवा तसा बदलता येतो.



२. इव्हेंट डिटेल्सः यात दिनांक, वेळ, टाईम झोन, ठिकाण, सविस्तर पत्ता आणि निमंत्रितांना द्यावयाचा संदेश आदी गोष्टींचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणाचा नकाशाही (गुगल मॅप) जोडता येतो.
३. गेस्ट लिस्टः पिंग वापरण्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही विविध कार्यक्रमांसाठीच्या निमंत्रितांसाठी लिस्ट्स तयार करून ठेवू शकता - उदा. शाळेतले मित्र, कॉलेजातले मित्र, अॉफिसमधले सहकारी, नातेवाईक, अगदी जवळचे काही खास लोक इ. या तयार असलेल्या लिस्टमधील सर्वांना तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवू शकता. तुमच्या मेलबॉक्समधील (याहू, जी-मेल, हॉटमेल, प्लॅक्सो इ.) कॉन्टॅक्ट्सही इम्पोर्ट करता येतात. व्ही-कार्ड किंवा सीएसव्ही फॉरमॅटमधील कॉन्टॅक्ट्सही इम्पोर्ट करता येतात. हेच इन्व्हिटेशन तुम्ही ट्विटरवर देखील पोस्ट करू शकता.
४. आरएसव्हीपीः कार्यक्रमापूवर्वी रिमाईंडर मेसेजेसही पाठविता येतात. निमंत्रण स्वीकारल्यानंतर थॅंक यू नोटही पाठवली जाते.
५. इव्हेंट वेब पेजः सदर कार्यक्रमासाठी स्वतंत्र वेब पेजही तयार करून निमंत्रितांना पाठवता येते.
६. फोटो आणि व्हिडीओः कार्यक्रमानच्या वेबपेजवर फोटो आणि व्हिडीओही अपलोड करता येतात. फ्लिकरवरून फोटो किंवा अल्बमही इम्पोर्ट करू शकता.
७. इव्हेंट फंड आणि गिफ्ट रजिस्ट्रीः माजी विद्याथर्थी मेळावा किंवा अशाच इतर काही कार्यक्रमासाठी निधी गोळा करावा लागतो. त्यात घोळ होण्याची शक्यता असते. पे-पालच्या साह्याने तुम्ही निमंत्रितांकडून निधी संकलनाचे कामही करू शकता. त्याचप्रमाणे अॅमेझॉनसारखी गिफ्ट व्हाऊचरही निमंत्रकास गिफ्ट म्हणून देऊ शकता.

एवढं सगळं केल्यानंतर ई-मेल, एसएमएस आणि प्रिंटच्या माध्यमातून तुम्ही निमंत्रण पाठवू शकाल. २० एसएमएससाठी दीड डॉलर एवढा खर्च येतो. त्याएेवजी तुम्ही गुगल एसएमएस चॅनेल वापरून मोफत एसएमएस पाठवू शकता. कार्यक्रमापूवर्वी तुम्हाला इव्हेंट रिपोर्टही मिळतो.

Related Posts :



1 comments »

  • sharemarkettips said:  

    Best work you have done, this online website is cool with great facts and looks.
    HNI investment trading calls