, ,

शोध - लो-कॉस्ट कॅरिअर्सचा

December 8, 2008 Leave a Comment

आर्थिक मंदीमुळे जागतिक तसेच भारतीय विमान कंपन्यांना मोठा फटका बसत असल्याच्या बातम्या सध्या रोज वाचायला मिळताहेत. खालील लिंक्सवर जरा नजर टाका, म्हणजे तुम्हाला याचे गांभीर्य लक्षात येईल.
Airlines See Big Traffic Drop and Expect More Bad News
Airlines record sharp drop in business travel
Meltdown effect: Airlines grounded, Rlys take wings

कॉपर्पोरेट हाऊसेस आणि वैयक्तिक पातळीवरदेखील कॉस्ट कटिंग सुरू झाल्याने काही महिन्यांपूवर्वी सहज विमानाने प्रवास करणारे आता एक तर प्रवास रद्द करीत असल्याचे दिसून येतेय. अगदीच अपरिहार्य असल्यास विमानाचा पयर्याय घेतला जातोय. अन्यथा लोक रेल्वेचा अॉप्शन पसंत करताहेत. काही महिन्यांपूवर्वी एव्हिएशन फ्युएलच्या किमती गगनाला भिडल्याने लो-कॉस्ट कॅरिअर देखील परवडत नव्हते. आता फ्युएल सरचार्ज कमी केल्याने लोक पुन्हा लो-कॉस्ट कॅरिअरचा अॉप्शन ठेवतील अशी चिन्हे आहेत. ही झाली भारतातील परिस्थिती. परदेशातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. अशावेळी खासगी किंवा कायर्यालयीन कामाकरिता परदेशात प्रवास करावयाचा झाल्यास आपण देखील सर्वप्रथम लो-कॉस्ट कॅरिअर शोधण्याचा प्रयत्न करू.

अॉनलाईन बुकिंगची सेवा जवळपास सर्वच विमान कंपन्या देतात. पण कुठल्या कंपनीचा तिकिट दर तुलनेने कमी आहे, हे शोधण्यासाठी सर्व कंपन्यांच्या साईटला भेट देणे म्हणजे वेळखाऊ काम आहे. अशा वेळी तुम्ही यात्रा किंवा मेक माय ट्रिप किंवा ट्रिपिटसारख्या साईटचा आधार घेता. यातून सर्व कंपन्यांचे फ्लाईट प्लॅन्स पाहून निर्णय घेता येतो व सवलतीत तिकिट बुकही करता येते. भारतात प्रवास करावयाचा असेल तर आपण थेट स्पाईस जेट किंवा इंडिगो एअरलाईन्सच्या साईटवर जाऊनही तिकिट बुक करू शकतो. पण समजा तुम्हाला दक्षिण अाफ्रिकेत किंवा अॉस्ट्रेलियात जायचं असेल तर? तेथील लो-कॉस्ट कॅरिअर आपल्याला सहसा माहित नसतात. अशावेळी तुम्ही एअर निन्जा या साईटची मदत घेऊ शकता. जगभरातील लो-कॉस्ट कॅरिअरची माहिती या साईटवर साठवलेली आहे. तुम्हाला ज्या ठिकाणाहून प्रवास सुरू करावयाचा आहे त्या देशाचे व ठिकाणाचे नाव आणि जिथे जायचे आहे त्या देशाचे आणि ठिकाणाचे नाव ड्रॉपडाऊन मेनूतून सिलेक्ट केल्यानंतर संबंधित मार्गांवरील लो-कॉस्ट कॅरिअर्स डिस्प्ले होतील. तुम्ही ठराविक कॅरिअरच्या साईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता व तिकिटही बुक करू शकता.
Related Posts :0 comments »