,

फ्लिकर अॉन मोबाईल

December 12, 2008 Leave a Comment

सुट्यांमध्ये मस्त भटकंतीला गेलेल्या शैलेशने मोबाईलवर भरपूर फोटो काढले. परत आल्यानंतर एकेक फोटो डाऊनलोड करून फ्लिकर, अॉरकुट, फेसबुकवर अपलोड करत बसलेला असताना त्याला जाणवले की, त्याचवेळी आपल्या मित्रांना फोटो पाठवता आले असते तर? मोबाईलवरून थेट फोटो पाठवायचे म्हटले तर एमएमएस हा सोपा आणि खात्रीलायक पयर्याय. पण त्याला पैसे अधिक मोजावे लागतात. तुमच्याकडे जीपीआरएसचा अनलिमिटेड डेटा ट्रान्स्फर प्लॅन असेल तर तुम्ही विशिष्ट अॅप्लीकेशन वापरून थेट मोबाईलवरून फोटो इतरांशी शेअर करू शकता.

फोटो शेअरिंग साईटमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लिकरवर तुमचे अकाऊंट असेल आणि जीपीआरएस अॅक्टिव्ह फोन असेल तर तुम्ही हे काम चुटकीसरशी करू शकता. मोबाईलच्या ब्राऊजरमध्ये जाऊन m.flickr.com (किंवा m.yahoo.com) असे टाईप करा किंवा येथे जाऊन तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. तुम्हाला आलेल्या मेसेजमध्ये एक लिंक असेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवर तुमचा याहूचा आयडी आणि पासवर्ड एंटर करा. तुम्ही फ्लिकरच्या मोबाईल व्हर्जनमध्ये एंटर झालेला आहात. ‘अपलोड न्यू फोटो’वर क्लिक करून फोन मेमरी किंवा मेमरी कार्डवरील फोटो सिलेक्ट करा. काही क्षणांत तुमचा फोटो फ्लिकरवर अपलोड होईल.या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सिटीझन जर्नलिस्टही होऊ शकता. ज्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे वातर्ताहर तात्काळ पोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी तुम्ही असाल तर तेथील फोटो तुम्ही फ्लिकरवर अपलोड करून संबंधितांना कळवू शकता. प्रसारमाध्यमेदेखील आपल्या वेबसाईटवरून असे आवाहन करू शकतात. त्यासाठी त्यांनी आपला फ्लिकर आयडी देऊन प्रेक्षकांना अथवा वाचकांना आपल्या फ्लिकर कॉन्टॅक्ट्समध्ये अॅड करण्यास सांगावे. असे केल्याने फोटो अपलोड करताना शेअर विथ कॉन्टॅक्ट्स असे म्हणून फोटो थेट त्यांच्यापर्यंत पोचवता येऊ शकतो.

  • नोकियाच्या एन सिरीज फोन्सवर फ्लिकर हे अॅप्लीकेशन अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहे.
  • ब्लॅकबेरी वापरणाऱ्यांनी येथे क्लिक करावे.
  • याहूच्या इतर सेवा मोबाईलवर अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही याहू गो वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा.
साधी-सोपी टेक्नॉलॉजीदेखील तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये feedm8.com/sasotechnology असे टाईप करून बुकमार्क करा.

Related Posts :0 comments »