,

सबकुछ मोबाईल!

December 13, 2008 Leave a Comment

मध्यप्रदेशची लोकसंख्या किती किंवा साबरमती आश्रम केव्हा बांधला गेला होता असे प्रश्न कोणी रस्त्यात विचारले तर आपली पुरती फजिती होते. लोकसंख्या वगैरे या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या वगैरे मुळीच नाहीत. शिवाय गुगल, विकिपेडियाची सवय झाल्यामुळे इंटरनेट अॉन असताना आपण एक सेकंदात सांगतो असे म्हणून पाठ असल्यागत मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंडची लोकसंख्या सांगून मोकळे होतो. पण असं रस्त्यात वगैरे विचारल्यावर. अॉफिसमधला ‘शेर’ रस्त्यात असा ‘ढेर’ होतो...

पण असं ढेर होऊन कसं चालेल? माहिती आपण खिशात घेऊन चालत असतो. तुमच्याकडे जीपीआरएस एनेबल्ड मोबाईल असेल तर तुम्ही गुगल, विकिपेडिया अॉनलाईन अॅक्सेस करून तितक्याच तत्परतेने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. गुगलचे मोबाईल सर्च तुम्ही वापरून पाहिलं असेलच. विकिपेडियाचीही मोबाईल एडिशन उपलब्ध आहेत. mobile.wikipedia.org असे टाईप करून तुम्ही मोबाईलसाठी तयार केलेले विकिपेडिया अॅक्सेस करू शकता. मोबाईल विकिपेडिया वापरण्यास कठीण जाते, असा माझा अनुभव आहे. डेस्कटॉपवर दिसणारे अखंड पेज मोबाईलवर विभागले जाते. त्यामुळे तुम्हाला अनेक वेळा Continue असे म्हणावे लागते. यात वेळ वाया जातो. मोबाईल विकिपेडिया एेवजी तुम्ही वॅपेडिया डॉट मोबी (www.wapedia.mobi) ही सेवा वापरल्यास तुम्ही तेच रिझल्ट्स एकाच पेजवर पाहू शकाल.


शिवाय यात विकिपेडिया, गुगल इमेजेस आणि ताप्तू (मोबाईल इंटरटेन्मेंट सर्च इंजिन) यापैकी कोणतीही सेवा वापरून रिझल्ट्स फेच करू शकता. याव्यतिरिक्त In the news, Featured content, Did you know? आदी व्हॅल्यू अॅडेड सेक्शन्सही यात पाहायला मिळतात. वॅपिपेडिया (www.wapipedia.org) ही याच प्रकारातील आणखी एक सेवा. मोबाईलसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या साईट्सची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीदेखील तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये feedm8.com/sasotechnology असे टाईप करून बुकमार्क करा.

Related Posts :0 comments »