, ,

भन्नाट वॉलपेपर्स

December 25, 2008 Leave a Comment


तुम्हाला मूडनुसार वॉलपेपर बदलणं आवडत असेल तर तुम्ही गुगलवर ‘जरा हटके’ वॉलपेपर शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असाल. व्यर्थ अशासाठी की वॉलपेपर असा सर्च दिल्यास शेकडो साईट्स मिळतात, पण त्यातल्या काहीच साईटवर तुम्हाला हवे तसे वॉलपेपर्स मिळतात. मिळालेल्या वॉलपेपर्सचा आकारही तुमच्या स्क्रीन रिझोल्यूशनला कम्पॅटिबल नसेल तर मग स्ट्रेच, टाईल असे प्रकार आपण करून बघतो. पण त्याने मूळ वॉलपेपर डिस्टॉर्ट होतो व त्यातील गंमत निघून जाते.

तुम्हाला आवडेल असा आणि तुमच्या स्क्रीन साईजचा वॉलपेपर देणारी साईट म्हणजे इंटरफेस लिफ्ट. या साईटवर तुम्हाला हव्या त्या रिझोल्यूशनचे (वाईडस्क्रीन, ड्यूअल मॉनिटर, एचडीटीव्ही, मोबाईल इ.) वॉलपेपर्स मिळतील. आर्टिस्ट्स आणि टॅग्जनुसार सर्व वॉलपेपर्सचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला आवडीचे वॉलपेपर शोधण्यासाठी फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. या साईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर विंडोज आणि मॅकिन्तोषसाठी लागणारे आयकॉन्स आणि थीम्सही उपलब्ध आहेत.



Related Posts :



0 comments »