,

मोबाईल स्ट्रीमिंग

December 26, 2008 Leave a Comment

मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला. २६ नोव्हेंबरच्या रात्री सुरू झालेले ते भयनाट्य तब्बल ६० तास सुरू राहिले आणि आपल्यापैकी अनेकांनी न्यूज चॅनेल्सवर हे नाट्य लाईव्ह पाहिलेच असेल. या घटनेनंतर भारतीय न्यूज चॅनेल्सवर टीकेची झोड उठली. न्यूजवॉच या वेबसाईटने यासंबंधी एक झटपट survey घेतला. हा survey तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. असो. याच घटनेच्या वेळी तरुणांनी सोशल मीडियाचा - अथर्थात ट्विटर, फ्लिकर, फेसबुक इ.चा मोठ्या प्रमाणावर वापर केला (ई-सकाळवरील ही बातमी वाचा). अनेकांनी न्यूज चॅनेल्सपेक्षा या सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवला. सोशल मीडियासाठी सोर्स होते तुमच्या-आमच्यासारखे लोक. काही थेट घटनास्थळाहून माहिती देत होते; काही ताज, ओबेरॉयमध्ये अडकलेल्या मित्रांशी फोन, एसएमएसद्वारे संपर्क साधून माहिती देत होते. सोशल मीडियातून लाईव्ह व्हिडीओज मात्र प्रसारित झाले नाहीत. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेता, एका अर्थाने बरेच झाले असे म्हणावे लागेल. पण तुमच्यासमोर बातमीमूल्य असलेली घटना घडत असताना तुम्ही व्हिडीओ फॉर्ममध्ये ती इतरांशी थेट शेअर करू शकलात तर?



होय. असे करता येणे शक्य आहे. मोबाईलचा वापर करून एखादा व्हिडीओ तुम्ही आता थेट इतरांशी शेअर करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस अथर्थात मोबाईल इंटरनेट कनेक्शन आणि क्विक असणे गरजेचे आहे. क्विक(Qik) ही सेवा वापरून तुम्ही मोबाईलवरून शूट करत असलेला व्हिडीओ थेट इतरांशी शेअर करू शकता. क्विक आयकफोन, ब्लॅकबेरी, विंडोज मोबाईल आणि सिंबियन फोनसाठी उपलब्ध आहे. क्विक वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
१. क्विकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. यासाठी केवळ २ ते ३ मिनिटे लागतात.
२. त्यानंतर तुमचा मोबाईल हॅंडसेट निवडून क्विकचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्या. तुम्ही एसएमएसने वॅप लिंक मागवू शकता अथवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून ब्लुटूथने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता.


३. मोबाईलवर क्लिक इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातून तुमच्या क्विक अकाऊंटवर लॉग-इन व्हा.
४. आता क्विकमध्ये जाऊन स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतर काही क्षणांत तुम्ही शूट करत असलेला व्हिडीओ तुम्ही कॉम्प्युटरवर पाहू शकाल. लक्षात ठेवा, क्विकचा वापर करून स्ट्रीम केलेला पहिला व्हिडीओ तुम्हाला सवर्वांसोबत शेअर करावा लागतो. त्यानंतर मात्र तुम्ही ग्रुप्स तयार करून तो ठराविक लोकांसोबत शेअर करू शकता.
५. स्ट्रीम होत असलेला व्हिडीओ लाईव्ह पाहता येतो. त्यानंतर तो तुम्ही FLV, 3GP किंवा MP4 फॉरमॅटमध्ये डाऊनलोडही करून घेऊ शकता. व्हिडीओ कुठे शूट केला याचे लोकेशन गुगल मॅपवर पाहता देखील येते.

क्विकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रीमिंग सुरू असताना तुम्ही इतरांशी चॅटही करू शकता. म्हणजे, तुम्ही समोरच्या व्यक्तीस हवा तसा कॅमेरा फिरवून त्याला हवा तो अॅंगल मिळवून देऊ शकता. न्यूज चॅनेल्स आणि न्यूज वेबसाईट्सना या सेवाचा प्रचंड फायदा होऊ शकतो.

Related Posts :



0 comments »