, ,

नवीन वषर्षाच्या (मोफत) हार्दिक शुभेच्छा!

December 30, 2008 Leave a Comment

सर्वप्रथम, साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या सर्व वाचकांनी नव्या वषर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...मनापासून!
नवीन वषर्षाच्या शुभेच्छा एसएमएसवरून पाठवताना आपण जरा विचार करतो. कारण फोनबुकमधल्या दोन-चारशे जणांना एसएमएस पाठवयाचा म्हटलं तर किमान दोन-अडीचशे रुपयांचा फटका बसतो. एरवी दरमहा अडीचशे रुपये बिल भरण्याची सवय लागलेल्यांना नवीन वषर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाच-सहाशे रुपये बिल भरणे कठीण जाते. नवीन वषर्षाचे एसएमएस पाठवण्यासाठी आणि नव्या वषर्षात एसएमएसचे बिल कमी करण्यासाठी काय करता येईल, याबद्दल मी आज माहिती देणार आहे.

कॉम्प्युटर आणि मोबाईलवरून मोफत एसएमएस पाठवण्यासाठी तुम्ही एसएमएस लाईफ डॉट इन या नव्या सेवेचा वापर करू शकता. मोफत एसएमएसची सुविधा इतरही काही कंपन्यांकडून दिली जाते. तथापि, एसएमएस लाईफचे वैशिष्ट्य म्हणजे या सेवेचे मोबाईल अॅप्लीकेशन वापरून तुम्ही जीपीआरएस किंवा वाय-फायच्या आधारेही मोफत एसएमएस पाठवू शकता. एसएमएस लाईफ वापरण्यासाठी सर्वप्रथम या साईटवर रजिस्टर व्हावे लागते. तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा लॉग-इन आयडी असतो. लॉग-इन झाल्यानंतर तुम्ही ८० कॅरेक्टर्समध्ये तुमचा मेसेज टाईप करून हव्या त्या व्यक्तीला पाठवू शकता. उरलेल्या ८० कॅरेक्टर्समध्ये एसएमएस लाईफतफर्फे जाहिरात इन्सर्ट केली जाते. या सेवेत अॉनलाईन फोनबुकही तयार करता येते. एक व्यक्ती एका दिवसात जास्तीत-जास्त १०० एसएमएस पाठवू शकते. या सेवेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एसएमएस शेड्यूलही करू शकता. अथर्थात एक तारखेला सकाळी १० वाजता पाठवायचा एसएमएस तुम्ही आज शेड्यूल करून ठेवू शकता. सदर एसएमएस दिलेल्या तारखेस संबंधित व्यक्तींना पाठवला जातो. सर्वसाधारण मोबाईलमध्ये एसएमएस शेड्यूलिंगची सुविधा नसते. वाढदिवस, अॅनिव्हर्सरीज आदींचे अलर्टही तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता.या सर्व गोष्टी मोबाईलवरूनही अॅक्सेस करता येतात. त्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. मोबाईल ब्राऊजरमधून m.smslife.in या साईवर जाऊन एसएमएस लाईफचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करा. लॉग-इन झाल्यानंतर तुम्ही थेट तुमच्या मोबाईल फोनबुकमधील क्रमांकावर एसएमएस लाईफच्या आधारे मेसेज पाठवू शकाल.

Related Posts :3 comments »

 • Vijay Keluskar said:  

  Amit, new year wishes to you. thanks for keeping us informed about all new websites. Hope to receive more in coming year. keep it up.
  Thanks for this post too...it is nice. :-)

 • Anonymous said:  

  Hallo amit..
  Happy new year..
  nice information...

  Thank you!

 • rupali amit joshi said:  

  Hallo amit..
  Happy new year..
  nice information...

  Thank you!