, , , ,

इसको लगा डाला, तो लाईफ ‘जिंगा’लाला!

June 4, 2009 Leave a Comment

एखाद्या आवडत्या साईटवरील विशिष्ट सेक्शन कॅप्चर करण्यासाठी तुम्ही काय करता? विंडोज वापरणारे प्रिंट स्क्रीन किंवा मॅकिन्तोष वापरणारे Command+Shift+3 वापर असतील. पण यातून हवा तो सेक्शन वेगळा काढण्यासाठी ‘इमेज एडिट’ करावी लागते. त्याऐवजी जे सेक्शन कॅप्चर करायचं आहे तेवढंच करा. यासाठी या क्षेत्रातील दिग्गज ‘टेकस्मिथ’ने एक फ्री स्क्रीन कॅप्चर सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ‘स्नॅग-इट’ आणि ‘कॅमटाशिया स्टुडियो’चे निर्माते असलेल्या ‘टेकस्मिथ’ने सर्वसामान्य ग्राहकांसाठी ‘जिंग’ हा नवा आणि मोफत पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
‘जिंग’च्या माध्यमातून तुम्ही स्टिल आणि व्हिडीओ अशा दोन्ही प्रकारांत स्क्रीन कॅप्चर करू शकता. हव्या त्या आकार स्क्रीनचे कॅप्चर घेणे किंवा स्क्रीनवरील अॅक्टिव्हिटीचे पाच मिनिटांपर्यंत रेकॉर्डिंग करणे याद्वारे शक्य होते. स्टिल स्क्रीन कॅप्चरसाठी वापरले जाणारे ‘स्नॅग-इट’ (५० डॉलर्स) आणि स्क्रीन रेकॉर्डिंसाठी वापरले जाणारे ‘कॅमटाशिया स्टुडिओ’ (२९९ डॉलर्स) ही दोन्ही सॉफ्टवेअर्स प्रोफेशनल गटात मोडतात. ‘जिंग’चेही प्रोफेशनल व्हर्जन (१५ डॉलर्स प्रतिवर्ष) उपलब्ध
आहे; पण मोफत व्हर्जनमध्ये सर्वसामान्य ग्राहकाच्या सर्व गरजा भागू शकतात.

‘जिंग’ विंडोज (एक्सपी, व्हिस्टा) आणि मॅकिन्तोषसाठी उपलब्ध आहे. साधारण आठ एमबीचे हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एका कोपऱ्यात ‘जिंग’चा सूर्य (Sun) तळपू लागतो. त्यावर कर्सर नेल्यास कॅप्चर, हिस्ट्री आणि मोअर असे अॉप्शन्स दिसतात. नवीन स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर कॅप्चर म्हणून हवा तेवढा स्क्रीन एरिया सिलेक्ट करा व ‘कॅप्चर अॅन इमेज’ किंवा ‘कॅप्चर ए व्हिडीओ’वर क्लिक करा. कॅप्चर झालेली इमेज (यावर टेक्स्ट आणि बॉक्सेसही अॅड करता येतात) किंवा व्हिडीओ तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर स्टोअर करून ठेऊ शकता किंवा ‘स्क्रीनकास्ट डॉट कॉम’वर थेट अपलोड करू शकता. ‘स्क्रीनकास्ट डॉट कॉम’ ही ‘टेकस्मिथ’चीच आणखी एक सेवा. ‘जिंग’ वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचे अकाऊंट अोपन करावे लागते. याच अकाऊंटचा वापर करून तुम्ही ‘स्क्रीनकास्ट’वर दोन जीबी पर्यंतचा डाटा स्टोअर करून ठेऊ शकता. हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत कॅप्चर केलेल्या इमेजेस आणि व्हिडीओ दिसतात. मोअरमध्ये जाऊन तुम्ही ‘जिंग’च्या सेटिंग्ज बदलू शकता. उदा. कॉम्प्युटर स्टार्ट केल्यानंतर ‘जिंग’ अॅक्टिव्हेट व्हायला हवे की नको वगैरे सेटिंग्ज इथून बदलता येतात. ‘जिंग’च्या मोफत व्हर्जनमध्ये व्हिडीओ केवळ फ्लॅश फॉरमॅटमध्ये (swf) सेव्ह करता येतात; प्रोफेशनल व्हर्जनमध्ये ते mpeg4 फॉरमॅटमध्येही सेव्ह करता येऊ शकतात - एवढाच काय तो फरक! ट्युटोरियल, प्रेझेंटेशन वगैरे तयार करण्यासाठी या सेवेचा मोठा उपयोग होतो.

See How Jing Works
See a Video Capture

Related Posts :



0 comments »