, , ,

गुगलचे ‘अॉल-इन-वन’ मोबाईल अॅप्लिकेशन

June 22, 2009 Leave a Comment

आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या गुगलच्या अनेक सेवा आपण रोज वापरत असतो. गुगल सर्च खेरीज, जी-मेल, यू ट्यूब, गुगल रीडर, अॉर्कुट, गुगल कॅलेंडर, न्यूज, ब्लॉगर आदी सेवाही कमी-अधिक प्रमाणात निश्चित वापरल्या जातात. भारतात ज्या वेगाने कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा प्रसार होतोय त्याहून कित्येक जास्त पटीने मोबाईल आणि मोबाईल इंटरनेटचा प्रसार होतोय. फिडेलिटी इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण मोबाईलधारकांपैकी १० टक्के लोक मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात.

हा आकडा जवळपास सव्वाचार कोटींवर जातो. यातील सुमारे ८० लाख लोक नियमित (म्हणजे अगदी दररोज) मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात, अशी आकडेवारीही फिडेलिटीने जाहीर केली आहे. थोडक्यात काय तर, अख्खा भारतंच इंटरनेटसाठी आता मोबाईलवर अवलंबून राहणार आहे. आकडेवारीतून बाहेर पडून आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात.

मोबाईलचे महत्त्व ओळखून गुगलने त्यांच्या एकेक सेवेसाठीचे मोबाईल अॅप्लिकेशन्स लाँच करणे सुरूच ठेवले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी अॉर्कुटचे मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले. जी-मेल, यूट्यूब, गुगल मॅप्स आदी अॅप्लिकेशन्स अगोदर उपलब्ध होते. पण प्रत्येक अॅप्लिकेशनचा आयकॉन शोधून त्यावर क्लिक करायची गरज आता उरली नाहीये. सिंबियन (S60) अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या मोबाईल फोनसाठी गुगलचे मास्टर मोबाईल अॅप्लिकेशन (गुगल मोबाईल अॅप) नुकतेच सादर करण्यात आले आहे. आयफोन, ब्लॅकबेरी आणि विंडोज मोबाईलसाठी हे अॅप्लिकेशन अगोदरंच उपलब्ध होते.
गुगलच्या तमाम सेवा तुम्ही या मास्टर अॅप्लिकेशनमधून अॅक्सेस करू शकता. अर्थात, त्यातील विविध अॅप्लिकेशन्स अगोदर इन्स्टॉल करून घ्यावे लागतील. सर्च क्वेरी सजेशन्स आणि लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स ही मोबाईलची अॅपची खास वैशिष्ट्ये. हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर अगोदर तुमचा देश सिलेक्ट करावा लागतो. यात तुम्ही भारत सिलेक्ट केल्यास गुगलच्या सर्व अॅप्लिकेशनचा (उदा. यू ट्यूब) अॅक्सेस मिळणार नाही. तो हवा असल्यास देश विचारल्यास यूनायटेड स्टेट्स सिलेक्ट करा. या सेटिंग्ज तुम्ही नंतर बदलू शकता. लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स हवे असल्यास मात्र तुम्हाला तुम्ही राहत असलेला देशंच सिलेक्ट करावा लागेल.

गुगल मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये m.google.com असे टाईप करा.
सोनी-एरिक्सन, सॅमसंग मोबाईलधारकांसाठी स्वतंत्र अॅप्लिकेशन नसले तरी हीच लिंक वापरून एका ठिकाणाहून गुगलच्या सर्व सेवा अॅक्सेस करता येऊ शकतील.

अधिक माहितीसाठीः

Official Google Mobile Blog
Google Mobile Page

Related Posts :



1 comments »

  • Anonymous said:  

    Another great post from you. Keep it up.
    Buy Samsung Galaxy Grand Duos online from The Mobile Store http://www.themobilestore.in/