, , ,

फास्ट, फास्टर, फास्टेस्ट फायरफॉक्ससाठी...

July 1, 2009 Leave a Comment

नेट फारंच स्लो झालंय का रे? - शैलेशचा प्रश्न
नेट व्यवस्थित आहे. तुझं ब्राऊजर गंडलंय... - श्रीचे उत्तर

शैलेश फायरफॉक्सचा भक्त. कितीही सुंदर दिसणारं, सोयी-सुविधांनी युक्त असं नवं ब्राऊजर आलं तरी हा गडी फायरफॉक्सलाच चिकटून होता. शैलेशसारख्या फायरफॉक्सपंथीयांची ही नेहमीची तक्रार. हा ब्राऊजर प्रचंड मेमरी खातो, एक्स्टेन्शन्स वाढली की हा पार ढपतो इथपासून ते पेज लोड होण्यास प्रचंड वेळ लागतो इथपर्यंत अनेक तक्रारी सारख्या सुरू असतात. पण तरीदेखील हे लोक दुसऱ्या ब्राऊजरकडे वळत नाहीत. अशा फायरफॉक्सपंथीयांसाठीच आजची ही पोस्ट लिहितोय.

फायरफॉक्सच्या Configuration फाईलमध्ये किंचित बदल करून तुम्ही तुमच्या फायरफॉक्सला जोरदार पळवू शकता. अर्थात, यासाठी तुम्हाला Configuration चेंज करावे लागेल. पुढे दिलेल्या स्टेप्स अत्यंत काळजीपूर्वक फॉलो कराः

Cache फीचरसाठी राखून ठेवलेली RAM कमी करण्यासाठीः

सर्फिंगदरम्यान कॅशिंगसाठी फायरफॉक्सतर्फे ठराविक RAM वापरली जाते. यामुळे अनेकदा इतर प्रोसेसेस आणि फायरफॉक्सही स्लो होण्याची शक्यता असते. ही RAM कमी करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः

 • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
 • आता वरच्या बाजूस Filter नावाने एक सर्च बार येईल. त्यात browser.sessionhistory.max_total_viewer असा सर्च द्या.
 • Value वर क्लिक करून ती 0 अशी सेट करा (Default Value: -1)
पेज लोड स्पीड वाढवण्यासाठीः
फायरफॉक्समध्ये आपण जेव्हा एखाद्या साईटचा अॅड्रेस एंटर करतो तेव्हा त्या साईटच्या सर्व्हरला केवळ एकच रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यामुळे साहजिकच पेज लोड होण्यास वेळ लागतो. एकावेळी अनेक रिक्वेस्ट्स पाठवण्यासाठी पुढील बदल कराः
 • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
 • Filter मध्ये network.http.pipelining असे टाईप करून व्हॅल्यूवर क्लिक करा व ती True अशी सेट करा. (Default Value: False)
 • याच पद्धतीने network.http.proxy.pipelining असे टाईप करा. ही व्हॅल्यूही True अशी सेट करा. (Default Value: False)
 • आता network.http.pipelining.maxrequests असे टाईप करून ही व्हॅल्यू 10 अशी सेट करा. (Default Value: 4)
 • आता याच विंडोत राईट-क्लिक करून New > Integer असे सिलेक्ट करा. याला nglayout.initialpaint.delay असे नाव द्या आणि त्याची व्हॅल्यू 0 अशी सेट करा.
फायरफॉक्स मिनिमाईझ्ड असताना RAM दहा एमबीपर्यंत कमी करण्यासाठीः
फायरफॉक्स वापरताना बरीचशी RAM वापरली जाते. त्यामुळे इतर अॅप्लिकेशन्स अनेक वेळा हँग होण्याची किंवा स्लो होण्याची शक्यता असते. अशा वेळी फायरफॉक्स बंद केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. पण फायरफॉक्स मिनिमाईझ करून ठेवल्यास होणारा RAM चा वापर आपण कमी करू शकतो. असे करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
 • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
 • आता याच विंडोत राईट-क्लिक करून New > Boolean असे सिलेक्ट करा.
 • याला config.trim_on_minimize असे नाव देऊन एंटर करा.
 • नव्या बॉक्समध्ये याची व्हॅल्यू True अशी सेट करा.
या सगळ्या स्टेप्सनंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करा व नव्या स्पीडचा अनुभव घ्या! तुमचा अनुभव कॉमेंट्सच्य माध्यमातून इतराशी जरूर शेअर करा.
Source: http://www.zixpk.com/

Related Posts :1 comments »

 • Anonymous said:  

  Nice information. Buy Samsung Galaxy Grand Quattro online from http://themobilestore.in