,

डाऊनलोडः Nokia N97 आणि E75 च्या रिंगटोन्स!

July 4, 2009 Leave a Comment

नोकिया N97 या नव्या मोबाईल फोनची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. हा मोबाईल गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला खरा; पण ३५ हजार रुपये किमतीचा टॅग पाहून किती लोक त्याकडे वळतील याबद्दल शंकाच आहे. अर्थात, या मोबाईलची थेट स्पर्धा आयफोनशीच असणार आहे, त्यामुळे याची किंमत ३०-३२ हजारांच्या पुढे असेल, असे वाटत होतेच. कोणताही नवा मोबाईल बाजारात आला की तो घ्यावासा वाटतोच. एक-दोन हजारांनी बजेट पुढे-मागे करून तो फोन विकत घेण्याची आपली तयारीही असते. पण आकडा तीस हजारांच्या पुढे गेला की मागे सरकायला होतं. मग सध्याचा मोबाईल काय वाईट आहे, असं वाटायला लागतं.

यात जे आहे तेच नव्या मोबाईलमध्ये आहे. शिवाय नवा मोबाईल जरा मोठा आणि जड वाटतोय, असे म्हणून आपणंच आपल्या मनाची समजूत काढत राहतो. तर, ज्यांना N97 किंवा त्याच्या अगोदर आलेला E75 यापैकी एखादा मोबाईल आवडलेला आहे, घेण्याची इच्छाही होतेय, पण ‘बायको’ किंवा ‘खिसा’ परवानगी देत नाहीये, अशांसाठी एक खास अॉफर आहे - या दोन्ही मोबाईल फोनकरता तयार केलेल्या रिंगटोन्स तुम्ही तुमच्या सध्याच्या मोबाईलवर वापरू शकता.

कधी-कधी दुधाची तहान ताकावर भागवावी लागते, त्यातलाच हा प्रकार. सिंबियन ब्लॉगने या दोन्ही फोनसाठीच्या रिंगटोन्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात काही रिंगटोन्स नेहमीच्याच असल्या तरी त्यात जरासे बदल केल्याचे ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल. सर्वसाधारण रिंगटोन्सपेक्षा या रिंगटोन्स अधिक मॉडर्न आणि पॉलिश्ड वाटतात. N97 च्या पॅकेजमध्ये भारतीय बाजाच्या काही रिंगटोन्सही आहेत.

या सर्व रिंगटोन्स .aac फॉरमॅटमध्ये आहेत. तुमच्या मोबाईलवर या फॉरमॅटमधील रिंगटोन्स चालत असतील तर तुम्ही N97 आणि E75 च्या रिंगटोन्सचा आनंद घेऊ शकता.

Download:
Nokia N97 Ringtones
Nokia E75 Ringtones
Also Download:
Nokia N97 Theme by_Mandeep

Related Posts :0 comments »