वॉझमी आता हिंदीतसुद्धा!

June 5, 2008 Leave a Comment


अॉनलाईन टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्टर वॉझमी डॉट कॉम आता हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. वॉझमीचा वापर करून तुम्ही कोणतेही टेक्स्ट इंग्लिश, स्पॅनिश, पोतर्तुगीज, कटाला (फ्रान्स, स्पेन, इटली आणि अंडोरात बोलली जाणारी भाषा) आणि हिंदीमध्ये कन्व्हर्ट करता येते. वॉझमी हे वेब-बेस्ड टूल असल्यामुळे तुम्ही कन्व्हर्ट झालेला आवाज ब्राऊजरमध्ये एेकू शकता किंवा त्याची एमपीथ्री फाईल डाऊनलोडही करू शकता. ई-मेलमधील टेक्स्ट स्पीचमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ही सर्व्हिस उपयोगी आहे. त्यातील हिंदी वापरून आपण मराठी टेक्स्टही स्पीचमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. यासाठी मुंबईतील सी-डॅकच्या जनभारती या प्रकल्पाअंतर्गत विकसित केलेल्या ओपन-सोर्स लॅंग्वेज पॅकचा वापर केला आहे.


फायरफॉक्स, अॉपेरा, इंटरनेट एक्स्प्लोरर ब्राऊजरमध्ये एेकण्यासाठी येथे क्लिक करा.
वेबसाईट किंवा ब्लॉगमध्ये वॉझमी इंटिग्रेट करण्यासाठी येथे क्लिक करा.


ब्लॉगवरील हेच आर्टिकल डेमो म्हणून स्पीचमध्ये कन्व्हर्ट केले आहे. ते एेकण्यासाठी खालील अॉडियो प्लेयरवर क्लिक करा.



(इनपुट-बेस्ड टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्टर असल्यामुळे हिंदी किंवा मराठीतले उच्चार तितकेसे स्पष्ट येत नाहीत; मात्र इंग्लिशचे उच्चार पुरेसे स्पष्ट आहेत.)

वॉझमीबद्दल मी सर्वप्रथम येथे वाचले होते. Thanks Amit.

Related Posts :



0 comments »