,

फेक अॅड्रेसेस कसे ओळखाल?

June 5, 2008 Leave a Comment

आजकाल सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलीये. भारतात आताशा नेटबॅंकिंग आणि मोबाईल बॅंकिंगने जोर घेतलाय. त्यामुळे नेटबॅंकिंगचे पासवर्ड्स हॅक करून पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केल्याच्या घटना रोज कुठेतरी घडत असतात. तुम्ही जर नेटबॅंकिंग सेवा वापरत असाल तर पुढे दिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या टिप्स वाचा आणि सुरक्षित रहा.



1. बॅंकेकडून येणारे ई-मेल्स हे शक्यतो नो-रिप्लाय मेल्स असतात. म्हणजे ते फक्त नोटिफिकेशन म्हणून पाठविले जातात. त्यामुळे अशा कोणत्याही मेलला उत्तर पाठवू नये.
2. तुमचे यूजरनेम, कस्टमर आयडी आणि पासवर्ड यासंदर्भातली माहिती चुकूनही कुणाला पाठवू नका. बॅंकेच्या साईटव्यतिरिक्त ही माहिती अन्य कुठल्याही साईटवर भरू नका.
3. नेटबॅंकिंगला लॉग-इन होण्यापूर्वी ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमधील अॅड्रेस काळजीपूर्वक तपासा. अनेकदा तुम्ही टाईप केलेला अॅड्रेस फेक अॅड्रेसला रिडायरेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण आपल्याच बॅंकेच्या साईटवर लॉग-इन झालो आहोत ना, याची खात्री करून घ्यावी.

साईटचा अॅड्रेस क्रॉस-चेक कसा करावा?

१. फॉरवर्ड स्लॅश ( / ) किंवा फाईलनेमच्या अलिकडं येणारं .com किंवा इतर कोणतंही व्हॅलिड डोमेन नेम जे अॅड्रेसबारमध्ये सर्वांत शेवटी येतं, त्या डोमेनवर तुम्ही लॉग-इन होता.
(It will be the last genuine domain name that appears before any "/" or filename)

उदा.
A. http://westpac.com.au/login.php
वरील लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही http://westpac.com.au या साईटवर जाल.

B. http://westpac.com.au/login/users/secure/securebanking946.com/westpac/login.php

पहिल्या आणि दुसऱ्या लिंकमध्ये अॅड्रेस तोच आहे. पण दुसऱ्या लिंकमध्ये शेवटी येणारे व्हॅलिड डोमेन नेम हे securebanking946.com आहे. त्यामुळे तुम्ही या साईटवर जाल.

२. ज्यावेळी लिंकमध्ये आयपी अॅड्रेस असतो, त्यावेळी त्याच आयपी अॅड्रेसवर तुम्ही जाता.

उदा.

http://350.122.95.01/www.irs.gov/irforgetstatus/somethingelse/795886/index.htm

३. ज्यावेळी लिंकमध्ये अनेक डोमेन नेम जोडलेले असतात त्यावेळी शेवटच्या डोमेन नेम अगोदर असलेल्या साईटवर तुम्ही जाल.

उदा.


http://www3.netbank.commbank.com.au.my-wob.com/netbank/bankmain/

वरील लिंकमध्ये तुम्ही my-web.com या साईटवर जाल.

Related Posts :



0 comments »