आयट्यून्समधून तयार करा रिंगटोन्स!
तुमच्यापैकी अनेकांकडे अॅपल आयपॉड असेलंच? मी अॅपल अायपॉड म्हणतोय...अनेक लोक साध्या एमपीथ्री प्लेयरलादेखील आयपॉड म्हणतात. ते चुकीचे आहे. असो. आयपॉड कोणत्याही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला कनेक्ट करण्यासाठी अॅपल आयट्यून्स हे सॉफ्टवेअर वापरावे लागते. तुमच्याकडे जर आयट्यून्सचे लेटेस्ट व्हर्जन (आयट्यून्स ७.६) असेल तर त्यातील एक नवं फीचर तुम्ही पाहिले असेल. नव्या आयट्यून्समधून तुम्ही कोणतंही गाणं एमपीथ्री रिंगटोनमध्ये कन्व्हर्ट करू शकता. आयट्यूनच्या नेव्हिगेशन बारमध्ये स्टोअरवर क्लिक केल्यास क्रिएट रिंगटोन असा अॉप्शन दिसेल. पण यात एक गोम आहे. आयट्यून्स स्टोअरमधून विकत घेतलेल्या गाण्याच्याच रिंगटोन याद्वारे तयार करता येतात. त्यामुळे आयट्यून्स स्टोअरमध्ये फ्री ठेवलेल्या गाण्यांच्याच रिंगटोन्स तुम्ही तयार करू शकता...
आता तुम्ही म्हणाल, एवढे चांगले फीचर आहे. पण काय उपयोग? आमच्याकडे असलेल्या गाण्यांतून रिंगटोन तयार करण्यासाठी काही पयर्याय आहे का? येस्स...आहे. यासाठी एक हॅक आहे. पुढे दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा. या स्टेप्स मॅक अॉपरेटिंग सिस्टिमसाठी आहेत. पण काही कमांड्सची नावं सोडल्यास त्या विंडोजसाठीही लागू होतील. सो, गेट रेडी टू मेक यूवर कस्टम रिंगटोन्स - फ्री अॉफ कॉस्ट!
1. आयट्यून्समध्ये प्रेफरन्सेस > अॅडव्हान्स्डमध्ये जाऊन इम्पोर्टिंग टॅबवर क्लिक करा
2. इम्पोर्ट यूजिंग यावर जाऊन एमपीथ्री एनकोडर सिलेक्ट करा
3. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन कस्टम सिलेक्ट करा
4. कस्टम सेंटिंगसाठी वेगळी विंडो ओपन होईल. त्यात जाऊन स्टिरिओ बिट रेट ६४ केबीपीएस एवढा ठेवा. बाकी कोणताही बदल न करता ओके म्हणा.
5. अॅडव्हान्स्ड मेनूही ओके म्हणून क्लोज करा.
6. आता आयट्यून्समध्ये जाऊन जे गाणे तुम्हाला रिंगटोनमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे ते हायलाईट करा.
त्यावर राईट-क्लिक करून गेट-इन्फो किंवा प्रॉपर्टीजवर क्लिक करा.
7. अॉप्शन टॅबवर क्लिक करा. त्यात स्टार्ट टाईम आणि स्टॉप टाईम असे अॉप्शन्स असतील. त्या दोन्ही बॉक्सेसवर चेक करून 8. तुम्हाला हव्या त्या पोर्शनच्या वेळा एंटर करा. ओके म्हणून त्यातून बाहेर या.
9. आता पुन्हा आयट्यून्समध्ये येऊन त्याच गाण्यावर हायलाईट करा. नेव्हिगेशन बारमध्ये अॅडव्हान्सड टॅबवर क्लिक करा. त्यात कन्व्हर्ट सिलेक्शन टू एमपीथ्री अशी कमांड असेल. त्यावर क्लिक करा. तुमची रिंगटोन तयार आहे.
10. आयट्यूनच्या डिफॉल्ट म्यूझिक फोल्डरमध्ये या रिंगटोनची फाईल असेल. ती ब्लुटूथ किंवा डेटा केबलने तुमच्या फोनवर ट्रान्स्फर करा.
(लक्षात ठेवाः आयट्यून्समध्ये जाऊन स्टेप ६ ते ८ पुन्हा रिपीट करा आणि स्टार्ट टाईम वर स्टॉप टाईम अनचेक करा.)
Thanks Jenny
mitra sundar blogspot aahe..
Mi majhya anek mitranna hi suggest kel aahe..
Sagar
hey amit thanks for such a wonderful information.. really nice blog!
keep it up!
Hi
Gr8 Job. I like your blogs.
You'r all topics are helpful for us.
Shubhechya...
Regards
Suhas