तुम्ही जी-मेल लॅब्ज ट्राय केलंत का?

June 6, 2008 Leave a Comment


गुगलने काल रात्री जी-मेल लॅब्ज नावाचे नवे फीचर लॉंच केले आहे. हे फीचर तुम्हाला तुमच्या जी-मेलच्या सेटिंग्जमध्ये सर्वांत शेवटचा टॅब म्हणून पाहायला मिळेल. गुगलमधील डेव्हलपर्स आणि जी-मेलधारकांच्या सूचना यातून हे फीचर तयार झाले असून त्यात तेरा गोष्टींचा समावेश आहे.
1. सेव्ह्ड सर्चेस किंवा महत्त्वाच्या मेसेजेसाठी क्विक लिंक्स
2. सुपरस्टार्स - विविध प्रकारच्या उपयोगासाठी स्टार आयकॉन्स
3. जी-मेल चॅटमध्ये प्रोफाईल पिक्चर्स (जी-टॉकसारखे)
4. फिक्स्ड विड्थ फॉंट (रिप्लाय करताना उपयोगी)
5. स्वतः सेट करण्यासारखे कीबोर्ड शॉर्टकट्स
6. माऊस गेस्चर्स
7. रॅंडम सिग्नेचर
8. सिग्नेचरमध्ये बदल करण्याची सोय
9. बदल करण्यायोग्य डेट-फॉरमॅट
10. मझल - जी-मेल चॅटमधील कॉन्टॅक्ट्सचे स्टेटस मेसेजेस लपविण्याची सोय
11. जी-मेलमध्ये स्नेक हा प्रसिद्ध गेम
12. ई-मेल स्क्रीन किमान १५ मिनिटांसाठी ब्लॉक करण्याची सोय
13. अनरिड मेल काऊंट लपविण्याची सोय

यातील अनेक गोष्टी मी अजून वापरून पाहिलेल्या नाहीत. वाचकांनी त्यापैकी काही वापरल्या असतील तर खालील पोलमध्ये सहभाग घ्यावा. साधी-सोपीच्या इतर वाचकांना त्याचा फायदा होईल.




Related Posts :



1 comments »

  • TECHFREAK said:  

    Uttam!! Aasach lihat raha , Sadya ani Sopya Bhashet.
    Aabhar

    Very good! Keeep such writing , in simple and plain language.

    Thanks

    http://techfreakindia.blogspot.com