दहा मिनिटांत लग्नाची वेबसाईट...
तुमच्यापैकी किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणाचं अशात लग्न असल्यास निमंत्रण देण्यासाठी पत्रिका, फोन याउपर काही पर्यायांचा तुम्ही विचार केलाय? ई-मेल, एसएमएस की आणखी काही? लग्नाच्या धावपळीत तुमच्याकडे दहा मिनिटं असतील तर निमंत्रण देण्याचा एक आधुनिक आणि उत्तम मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे. साधे ई-मेल इन्व्हाईट पाठवण्यापेक्षा एखादी सुंदर वेबसाईट तयार केली तर?
अहमदाबादेतील काही तरुण-तरुणींनी मिळून Firstphera नावाची एक सेवा सुरू केली आहे.
फर्स्ट फेरा डॉट कॉममध्ये अगदी पाच ते दहा मिनिटांत तुम्ही तुमच्या लग्नाची साईट तयार करू शकता. यावर रजिस्टर करण्यासाठी तुमचे आणि तुमच्या वाग्दत्त वधू किंवा वराचे नाव, लग्नाची तारीख, ठिकाण आदी माहिती भरावी लागते. तुमच्या वेबसाईटसाठी एखाद्या सुंदर नावाचा विचार करा (उदा. http://www.firstphera.com/happycouple) आणि रजिस्टर व्हा. उपलब्ध असलेल्या १७ डिझाईन्समधून एखादे डिझाईन निवडा. बॅकग्राऊंडला एखादे म्युझिक हवे असल्यास तेही अपलोड करू शकता.
आता तुम्ही तुमच्या लग्नाची स्टोरी (लव्ह, अरेंज्ड वगैरे) लिहू शकता, तुमचे निमंत्रण लिहू शकता, कार्यक्रमपत्रिका देऊ शकता, फोटो अल्बम तयार करू शकता...असे अनेक पेजेस तुम्ही तयार करून या साईटवर होस्ट करू शकता. साईट पब्लिश केल्यानंतर त्याची लिंक तुम्ही ई-मेलद्वारे सर्व नातेवाईक, मित्र, सहकारी यांना पाठवू शकता. अॉरकुट, फेसबुक, मायस्पेस आदी अकाऊंट्सवर ही लिंक ठेवून तुम्ही सर्वांना तुमच्या लग्नाची माहिती, निमंत्रण देऊ शकता. या साईटवर जाऊन तुमचे मित्र-मैत्रिणी तुम्हाला शुभेच्छासंदेशही देऊ शकतात. या साईटवरून तुम्ही लग्नाची शॉपिंगही करू शकता.
फर्स्ट फेरा डॉट कॉमवर वेडिंग साईट कशी तयार करावी यासाठीच्या गाईडसाठी येथे क्लिक करा.
सॅम्पल वेडिंग साईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments »
Post a Comment