पीडीएफ पाहण्याचा नवा मार्ग

June 9, 2008 Leave a Comment

एखादी वर्ड फाईल, एखादे पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन दुसऱ्याला पाठविताना त्याच्याकडे अॉफिसचे लेटेस्ट व्हर्जन असेल का, त्याच्याकडे मी वापरलेले फॉंट्स असतील का वगैरे बाबी विचारात घ्याव्या लागतात. विशेषतः मराठी किंवा इतर कोणतीही प्रादेशिक भाषा वापरताना तर अधिक काळजी घ्यावी लागते. अशा वेळी आपण सरळ पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट अर्थात पीडीएफचा आधार घेतो. शिवाय अॅडोबतर्फे अॅक्रोबॅट रीडर मोफत मिळते, त्यामुळे प्रत्येकाला पीडीएफ फाईल्स पाहता येतात. पण पीडीएफचाच कंटाळा आला तर? एखाद्यावेळी आपण काही सर्च करताना अनेक रिझल्ट्स पीडीएफमध्ये येतात. त्यावेळी व्ह्यू एचटीएमएल म्हणून आपण त्यातील टेक्स्ट पाहू शकतो. पण त्यातील इमेजेस, चार्ट्स व्यवस्थित पाहण्यासाठी पीडीएफ डाऊनलोडंच करून घ्यावं लागतं. अशा वेळी काय करायचं? डाऊनलोड न करता किंवा पीडीएफ रीडर नसताना पीडीएफ फाईल्स बघता येतील?


पीडीएफमीनॉट या अॉनलाईन पीडीएफ व्ह्यूअरच्या माध्यमातून तुम्हाला कोणतीही पीडीएफ फाईल डाऊनलोड न करता आणि अॅक्रोबॅट नसतानाही पाहत येईल. यासाठी पीडीएफमीनॉटने आधार घेतलाय तो अॅडोबच्याच फ्लॅशचा. होय...पीडीएफमीनॉटवर तुम्ही हव्या असलेल्या पीडीएफ फाईलची यूआरएल किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरील लोकेशन दिले की ती पीडीएफ फाईल फ्लॅशमध्ये कन्व्हर्ट होऊन वेगळ्या विंडोत ओपन होते. पीडीएफमीनॉटचे फायरफॉक्स एक्स्टेंशनही उपलब्ध आहे.

तुम्ही एखादी पीडीएफ फाईल कुठेतरी होस्ट केलेली असेल आणि त्याची लिंक कुणालातरी पाठवायची असेल. त्या व्यक्तीकडे अॅक्रोबॅट रीडर नसेल तर तुम्ही आहे ती लिंक पीडीएफमीनॉटचा वापर करून पाहण्यासाठी अशी पाठवाः
तुमच्या फाईलची लिंक समजा http://test.com/document.pdf अशी आहे. आता हीच लिंक थेट पीडीएफमीनॉटवर पाहायची असेल तर त्याअगोदर http://pdfmenot.com/view/ ही लिंक जोड. म्हणजे नवी लिंक अशी होईल -
http://pdfmenot.com/view/http://test.com/document.pdf
पीडीएफमीनॉट हे वेबसाईट किंवा ब्लॉगमध्येही एम्बेड करता येते. म्हणजे, तुम्ही एखादे पीडीएफ डॉक्युमेंट यूट्यूबप्रमाणे फ्लॅशमध्ये पाहू शकाल.

Related Posts :



0 comments »