ओव्हर टू सॅंडी
रीटा, रोझी, काजल, सपना...नावं ओळखीची वाटताहेत ना? बॉसेसच्या पर्सनल सेक्रेटरींची ही काही फेमस नावं. तुमच्या आजूबाजूलाही असतील. बॉसकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी, त्यांच्या अपॉईंटमेंट्सवर लक्ष ठेवण्यासाठी, मीटिंगची आठवण करून देण्यासाठी, त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी रीटा, रोझी, काजल काम करत असतात. बॉस ही जमात एवढी बिझी असते की त्यांना सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यावी लागते. (तुम्ही बॉस आहात आणि आम्ही तुमच्या सोबत काम करतो, जरा आमच्याकडेही लक्ष द्या, अशीही आठवण करून द्यावी लागते. असो.) एखाद्यावेळी आपल्याकडेही एकावेळी खूप कामं येतात आणि एक पूर्ण करण्याच्या नादात दुसरं काम विसरून जातो. अशावेळी वाटायला लागतं, आपल्यालाही मदत करणारी, आठवण करून देणारी एखादी रीटा, रोझी, काजल असावी. नाराज कशाला होताय? आहे ना...आपल्या सगळ्यासांठी सॅंडी आहे...
कोण आहे ही सॅंडी?
Hi! I’m Sandy, your new assistant. I'll remember the details so you can focus on what's important.
असा वेलकम मेसेज देणारी सॅंडी म्हणजे आपली अॉनलाईन असिस्टंट. सॅंडी ही तुमची ई-मेल असिस्टंट. तुम्हाला रोज मॉर्निंग डायजेस्ट पाठविणारी सॅंडी तुमच्या ई-मेलवरून तुम्हाला तुमच्या कामांची, अपॉईंटमेंट्सची आठवण करून देत असते. कशी? सोपं आहे. तुम्ही आय वॉन्ट सॅंडीवर रजिस्टर केलंत की तुमच्यासाठी एक खास ई-मेल अॅड्रेस तयार केला जातो. त्या मेलवर तुम्ही सॅंडीला मेल पाठवला (Cc किंवा BCc) केलात की झालं. सॅंडी तुम्हाला १५ मिनिटं अगोदर किंवा तुम्ही म्हणाल त्या वेळी एखाद्या मीटिंगची आठवण करून देणार.
सॅंडी तुम्हाला असे मॉर्निंग डायजेस्ट पाठवते.
उदा. तुम्हाला एखाद्या क्लाएंटला बुधवार, ११ जून रोजी सकाळी ११.३० वाजता भेटायचं आहे. तुम्ही मीटिंग फिक्स करण्यासाठी त्यासोबत काही मेल्स एक्स्चेंज केले असतील. आता ज्या मेलमध्ये मीटिंगची वेळ, ठिकाण फिक्स झाले असेल त्याची एक कॉपी सॅंडीला पाठवायची. मेलमध्ये Remind me to meet the client today @ 11.30 am in Cafe Coffee Day असं लिहून पाठवलं की तुमचं काम संपलं. तुम्हाला ती बरोबर आठवण करून देणार. सॅंडी फक्त इतकंच करत नाही. ती तुमची टू-डू लिस्ट, बुकमार्क्स, नोट्स, वर्कलिस्ट्स, कॉन्टॅक्ट्स आदी गोष्टीही मॅनेज करते. अशी ही सॅंडी. एकदा आजमावून पाहाच...
0 comments »
Post a Comment