झिप, झॅप, झूम!
अनेक वेळा आपल्याला मेलमध्ये एखादी हेवी फाईल झिप किंवा रार या एक्स्टेन्शनने कॉम्प्रेस करून येते. अशावेळी तुमच्याकडे त्या फाईल्स अनकॉम्प्रेस करण्यासाठीचे सॉफ्टवेअर नसेल तर पंचाईत होते. त्यातील कन्टेन्ट तुम्हाला ओपन करता येत नाही. बऱ्याचदा टाईमपासम्हणून पाठविलेल्या फॉरवर्ड मेलमध्येही कॉम्प्रेस्ड फाईल्स असतात. त्या डाऊनलोड करून अनकॉम्प्रेस केल्याशिवाय त्यात काय आहे, हे कळत नाही. अशावेळी त्या फाईलमधील कन्टेन्ट पाहून तो खरंच डाऊनलोड करण्यासारखा आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी एक सोप्पा मार्ग आहे...
वॉबझिप डॉट अॉर्गवर तुम्ही 7z, ZIP, GZIP, BZIP2, TAR, RAR, CAB, ISO, ARJ, LZHCHM, Z, CPIO, RPM, DEB आणि NSIS इतक्या प्रकाराने कॉम्प्रेस केलेल्या फाईल्स अनकॉम्प्रेस करू शकता. त्या फाईल अनकॉम्प्रेस झाल्यानंतर त्यातील एकेक फाईल स्वतंत्रपणे डाऊनलोड करता येते. तुम्ही एखादी कॉम्प्रेस्ड फाईल अॉनलाईन सेवेचा वापर करून होस्ट केलेली असेल तर (वाचाः हेवी फाईल्स पाठविण्याचे सोपे मार्ग) त्याची लिंक वापरूनही तुम्ही ती अनकॉम्प्रेस करू शकता.
वॉबझिपचा वापर करून .tar.gz and .tar.bz2 या एक्स्टेंशनच्या फाईल्स अनकॉम्प्रेस करताना अडचणी येत असल्याचा उल्लेख त्यांच्या साईटवर केला आहे. ही अडचण सोडल्यास वॉबझिप ही एक उत्तम सर््व्हीस आहे.
I tried this. Really nice service