या ‘िंवडो’खाली दडलंय काय?
एखादा चर्चेत असलेला किंवा वादात अडकलेला ब्लॉग किंवा एखाद्या साईटने आपल्याच बॉसवर किंवा कंपनीवर केलेली टीका अॉफिसमध्ये बसून वाचायची म्हणजे भलते कष्ट घ्यावे लागतात. शेजारी कोणीतरी बसलेलं असतं किंवा मागून बॉस जाण्याची शक्यता असते. अशावेळी विंडोज लहान करून वाचण्याची रिस्क घ्यावी लागते किंवा शेजारून एखादी व्यक्ती गेली की लगेच दुसऱ्या विंडोत वर्ड ओपन करून आपण काम करतोय, असा दिखावा करावा लागतो. तरीदेखील पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण इतक्यात हार मानू नका. इंटरनेटच्या या युगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बॉसला गुंगारा देण्यासाठी एक अॉनलाईन सेवा तयार आहे.
वर्कफ्रेंडली डॉट नेट हे त्या सेवेचं नाव. काम करता-करता तुम्ही एखादी वादग्रस्त साईट किंवा एखादा वादग्रस्त ब्लॉग वाचू शकता. वर्कफ्रेंडलीच्या अॅड्रेस बारमध्ये तुम्हाला जी साईट वाचायची आहे त्याचा अॅड्रेस टाकला की मायक्रोसॉफ्ट वर्ड २००३ सारख्या भासणाऱ्या विंडोमध्ये ती साईट ओपन होते. या वर्डसारख्या भासणाऱ्या विंडोमध्ये साईटचा लेअाऊट मात्र डिस्टर्ब होतो. टेक्स्ट व्यवस्थित वाचता येते.
वर्कफ्रेंडलीचा वापर केल्यास साईट्स अशा वर्डसारख्या भासणाऱ्या विंडोमध्ये ओपन होतात.
गंमत म्हणजे, यातही पकडले जाऊ नये याची वर्कफ्रेंडलीच्या निमर्मात्याने पूर्ण काळजी घेतली आहे. या विंडोमध्ये सवर्वांत वर डाव्या बाजूस ‘बॉस की’ नावाच्या कंट्रोलवर क्लिक केल्यास विंडोमध्ये एक डमी वर्ड फाईल ओपन होते. त्यामुळे तुमच्याकडे पाहणाऱ्यास कसलीही शंका येत नाही.
jabbardast!!!
ekdam chan ahe.