,

मशीन एक...और फायरफॉक्स दो?

June 27, 2008 Leave a Comment

तुम्ही फायरफॉक्स ३.० डाऊनलोड केलंत का? की तुम्ही फायरफॉक्स २.०वर समाधानी आहात? फायरफॉक्स ३.० ची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण किती नव्या सोयी-सुविधांपासून दूर जात आहोत. असो. एवढं करूनही तुम्हाला फायरफॉक्स २.०च हवं असेल तर राहू देत. पण एक शेवटचा अॉप्शन देऊन पाहतो. जर तुम्हाला दोन्ही व्हर्जन्स एकाचवेळी उपलब्ध करून दिली तर तुम्ही ट्राय कराल?

जेव्हा एखाद्या अप्लीकेशन किंवा सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन आपण इन्स्टॉल करतो त्यावेळी आपल्याकडे असलेले जुने व्हर्जन आपोआप रिप्लेस होते. त्यामुळे एकाच वेळी फायरफॉक्स २.० आणि ३.० वापरणे प्रॅक्टिकली शक्य नाही. पण एक सोपी ट्रिक वापरली तर हेही शक्य होते. ही ट्रिक केवळ मॅकिन्तोश अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांसाठी आहे.
तुम्ही जर फायरफॉक्स २.० वापरत असाल तर फायरफॉक्स ३.० डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर जेव्हा इन्स्टॉलेशनसाठी .dmg वर क्लिक कराल त्यावेळी खालीलप्रमाणे एक विंडो ओपन होईल.

नेहमीप्रमाणे इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही फायरफॉक्सचा लोगो अॅप्लीकेशन फोल्डरमध्ये ड्रॅग करता. तसे न करता फायरफॉक्सचा लोगो डेस्कटॉपवर ड्रॅग करा. आता हा लोगो रिनेम करा (म्हणजे फायरफॉक्स३ किंवा फायरफॉक्स न्यू असे काहीतरी नाव द्या). रिनेम केल्यानंतर हा लोगो अॅप्लीकेशन फोल्डरमध्ये ड्रॅग करून इन्स्टॉल करा. आता तुम्ही फायरफॉक्सची दोन्ही व्हर्जन्स डॅशबोर्डमध्ये ठेवून वापरू शकता.

िंवडोज वापरणाऱ्यांसाठीही एक ट्रिक आहे. पण ती थोडीशी कठीण आहे. त्यात चूक होण्याची शक्यता आहे. तरीदेखील ज्यांना प्रयोग करून पाहायचा आहे त्यांनी इथे भेट द्यावी.

Related Posts :0 comments »