, ,

लॅपटॉप चोरांपासून वाचण्यासाठी...

June 28, 2008 Leave a Comment


आजकाल व्हाईट कॉलर क्राईम्सचे प्रमाण खूप वाढले आहे. कोणाचे तरी बॅंक अकाऊंट हॅक करून पैसे पळविल्याच्या बातम्या कानावर पडत असतात. आपले अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून अॉनलाईन ट्रान्झॅक्शन्स करताना काय काळजी घ्यावी, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे व्हाईट कॉलर क्राईम करणारे त्यावर फारसे अवलंबून राहतंच नाहीत. आपण कुठे ढिसाळपणा करू शकतो, याकडे त्यांचे लक्ष असते. यातील एक म्हणजे, कोणत्या वेबसाईटवर लॉग-इन होतोय हे आपण काळजीपूर्वक तपासत नाही. त्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स मी फेक अॅड्रेसेस कसे ओळखाल? या पोस्टमध्ये दिल्या होत्या. यामुळे आपण इंटरनेटवर तरी किमान सुरक्षित राहू शकतो. आता प्रश्न राहिला तो अॉफलाईन सुरक्षिततेचा. म्हणजे, तुमचा लॅपटॉप समजा चोरीला गेला तर काय करायचं? अशी वेळ तुमच्यावर येऊ नये, परंतु आलीच तर चोराला ट्रॅक करणं शक्य आहे.

अॉनलाईन थेफ्ट ट्रॅकिंग सिस्टिम्सद्वारे तुम्ही चोरीस गेलेला लॅपटॉप नेमका कुठे आहे हे ट्रॅक करू शकता. यासाठी चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट करणे आवश्यक आहे. ‘लॅपटॉप लॉक’ हे या सेवेचे नाव. ‘लॅपटॉप लॉक’वर रजिस्टर करून तुमच्या लॅपटॉपचे डिटेल्स एंटर केल्यानंतर ‘लॅपटॉप लॉक’ क्लाएंट डाऊनलोड करावा लागतो. त्यानंतर हा क्लाएंट व तुमचे ‘लॅपटॉप लॉक’वरील अकाऊंट एकमेकांना लिंक केले की रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर डेस्कटॉप क्लाएंट ओपन करून लॅपटॉप चोरीस गेल्यावर काय प्रोसेस होणं अपेक्षित आहे, याची माहिती भरावी लागते. म्हणजे चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट केला की ‘लॅपटॉप लॉक’ अॅक्टिव्हेट होऊन ठरवून दिलेल्या प्रोसेसेस (उदा. महत्त्वाच्या ड्राईव्हमधील फाईल्स डिलीट करणे, काही फाईल्स एन्क्रिप्ट करणे वगैरे) पूर्ण करतो. चोरीला गेल्यानंतर तुम्ही ‘लॅपटॉप लॉक’च्या अकाऊंटवर लॉग-इन करून लॅपटॉपचे स्टेटस मिसिंग किंवा स्टोलन असे करावे लागते. त्यानंतर चोरट्याच्या आयपी अॅड्रेसवरून त्याचा नेमका पत्ता शोधला जातो. ‘लॅपटॉप लॉक’तर्फे चोरी पकडण्याची किंवा चोरीस गेलेला लॅपटॉप परत मिळवून देण्याची कोणतीही हम दिली जात नसली तरी ही माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरू शकते व तुमचा लॅपटॉप परत मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात. ‘लॅपटॉप लॉक’ ही सेवा फक्त विंडोज २०००, एक्सपी आणि व्हिस्टासाठी उपलब्ध आहे.

मॅकिन्तोश वापरणाऱ्यासाठी याहून अधिक खात्रीलायक सेवा उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे अंडरकव्हर. अंडरकव्हरची प्रोसेस ‘लॅपटॉप लॉक’शी मिळतीजुळती असली तरी यातील नवे फीचर म्हणजे चोरट्याने लॅपटॉप विकण्याचा प्रयत्न केला तर विकत घेणाऱ्यास, हा लॅपटॉप चोरीचा असल्याची माहिती मिळते. अंडरकव्हर ही पेड सेवा अाहे. मॅकिन्तोशमधील इनबिल्ट कॅमेऱ्याचा वापर करून चोरट्याचे फोटो पाठविण्यासाठी अायअलर्टयू ही सेवा कामाला येते. यातील कोणतीही सेवा तुमचा लॅपटॉप परत देण्याची हमी देत नसले तरी अधिक सुरक्षिततेसाठी या सेवा वापरण्यास काहीच हरकत नाही.

Related Posts :



0 comments »