,

हाकियाची हाक...

June 20, 2008 Leave a Comment


गुगलशिवाय आपला दिवस सरत नाही. दिवसाला किमान पन्नास-शंभरवेळा आपण गुगल सर्चचा वापर करतो. शिवाय जी-मेल, जी-टॉक, अॉरकुट, ब्लॉगर हेही तेवढेच जवळचे. तोंडी लावायला गुगल डॉक्स, गुगल मॅप्स, गुगल अर्थ हे आहेतच. कधी असा प्रश्न पडतो की गुगल नसते तर काय झालं असतं? काहीही झालं नसतं. गुगलची जागा दुसऱ्याने घेतली असती. जी-मेल आल्यावर आपण कसं याहू, हॉटमेल, रेडीफसोडून पळालो, तसं आणखी एखादं सर्च इंजिन आलं की आपण गुगल सोडून तिकडं वळू. तुम्हाला वाटेल, कालपर्यंत हा बरा होता...आज अचानक काय झालं. मला काहीही झालेलं नाही. खरं तर गुगलच्या साम्राज्याला धक्का देणं अवघड आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. आता हेच पाहा ना - हाकिया नावाच्या एका नव्या सर्च इंजिननं आताच गुगलला विचार करायला भाग पाडलंय.हो...न्यूयॉर्कमध्येच अस्तित्त्वात आलेल्या हाकियानं सिमॅंटिक (अर्थात मोस्ट लॉजिकल) सर्च रिझल्ट्स ची पद्धत अवलंबिल्यानं गुगलच्या अरिथमॅटिक सर्च पद्धतीला एका अर्थाने आव्हान दिल्यासारखंच आहे. एखाद्या प्रश्नावर आपण अचूक आणि तर्कशुद्ध उत्तराची अपेक्षा ठेवतो. एखाद्याने चटकन अचूक आणि योग्य उत्तर दिलं तर आपण प्रभावित होतो. याऊलट एखाद्याने तेच उत्तर देण्यासाठी आपली पाच-सात मिनिटे घेतली आणि पाल्हाळ लावत उत्तर दिलं तर साहजिकच आपण तितकेसे प्रभावित होत नाही. हाकियाच्या आणि सध्याच्या प्रचलित सर्च इंजिन्सच्या तंत्रज्ञानात नेमका हाच फरक आहे. उदा. हाकिया डॉट कॉमवर जाऊन आपण What is the population of Germany? असा सर्च दिल्यास आपल्यास सर्वांत आधी जर्मनीची ताजी लोकसंख्या पाहावयास मिळते. शेजारी जर्मनीचा ध्वजही पाहावयास मिळतो.

Search string: What is the population of Germany?

हाकियावरील रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गुगलवरील रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याहूवरील रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तुमच्या प्रश्नाशी सुसंगत असे रिझल्ट्स विविध कॅटेगरीत मांडले जातात. उदा. इमेज सर्च, कंट्री प्रोफाईल, गव्हर्न्मेंट अॅण्ड पॉलिटिक्स, एम्बासीज, हिस्टरी, कल्चर वगैरे. गुगलमध्ये तुम्ही हाच सर्च दिल्यास अचूक रिझल्ट्स मिळतात, पण त्यातून हवी ती माहिती काढण्यास आपल्याला अधिक कष्ट पडतात. हाकिया तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे जाणून तसेच रिझल्ट्स दाखवते. हाकियाचे रिझल्ट्स गुगल किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनपेक्षा अधिक दर्जेदार अाहेत, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. तुम्ही हाकिया आणि इतर सर्च इंजिनची तुलना करून पाहिल्यास तुम्हालाही तेच जाणवेल. याशिवाय हाकियामध्ये तुमच्यासारखीच माहिती शोधणाऱ्यांशी तुम्ही संपर्कही साधू शकता. हाकिया क्लब ही नावीन्यपूर्ण संकल्पनाही यात आहे. त्यामुळेच मी सुरवातीस म्हटलंय, की गुगलच्या साम्राज्याला तडा देणं अशक्य नाही. आता उद्या गुगलने हाकियाच विकत घेतलं तर वेगळी गोष्ट. कारण गुगलसाठी हे अशक्य मुळीच नाही!
हाकियाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Related Posts :2 comments »

  • रुचिरा said:  

    Hakiya chi mahiti dilyabaddal dhanyawad.

  • Amit Tekale said:  

    धन्यवाद रूचिरा.