,

सर्च विथ ‘एक्स्पीरियंस’

June 20, 2008 Leave a Comment

सिमॅंटिक सर्च इंजिननंतर काल मी व्हिज्युअल सर्च इंजिनसंदर्भात अधिक माहिती गोळा करत होतो. यापूर्वी साधी-सोपी टेक्नॉलॉजीमध्ये मी क्विन्टुरा या व्हिज्युअल सर्च इंजिनसंदर्भात माहिती दिली होती. क्विन्टुरतफर्फे मुलांसाठी क्विन्टुरा किड्स नावाने विशेष सेवा दिली जाते. सध्या अाणखी एक सेवा जोरात चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी (९ जून) जेव्हा स्टीव्ह जॉब्जने आयफोन थ्रीजीची घोषणा केली त्याच दिवशी डलासस्थित व्ह्यूझी नावाच्या एका कंपनीने आपले नवे व्हिज्युअल सर्च इंजिन (बीटा) लोकांसाठी खुले केले.



आयफोनचे वैशिष्ट्य म्हणजे आयफोनने लोकांना मोबाईलची एक नवी अनुभूती दिली. नवा एक्स्पीरियंस दिला. व्ह्यूझीचे निर्माते स्वतःला सर्च इंजिनमधील आयफोन म्हणवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार गुगल किंवा याहूचे रिझल्ट्स प्लेन टेक्स्ट फॉरमॅटमध्ये डिस्प्ले होतात. त्याएेवजी लोकांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले तर सर्च एक्स्पीरियंस देता येईल. त्यादृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. व्ह्यूझी वापरून पाहिल्यास तुम्हाला याची प्रचिती येईल.


सध्या व्ह्यूझीमध्ये खालील पयर्याय उपलब्ध आहेत -

Simple Text View: यात इतर सर्च इंजिनप्रमाणे रेग्युलर टेक्स्ट फॉरमॅटमध्ये रिझल्ट्स डिस्प्ले होतात.
4 Sources Viewः यात गुगल, याहू, आस्क आणि एमएसएन या चारही सर्च इंजिनमधून रिझल्ट्स एकत्रित करून डिस्प्ले केले जाता. यात कलर कोडिंगचा वापर केला आहे.
Basic Photo Viewः यात दिलेल्या सर्च स्ट्रिंगसाठी रेग्युलर इमेज रिझल्ट्स दाखवले जातात.
3D Photo cloudः यात तेच रिझल्ट्स थ्रीडीमध्ये दिसतात. हा एक्स्पीरियंस खूप छान वाटतो.
Celebrity Photo Viewः सेलेब्रिटीजचे विविध फोटो सर्च करण्यासाठी हा व्ह्यू उत्तम आहे.
Album Viewः म्युझिक, फिल्म अल्बम शोधण्यासाठी उत्तम.
Web Screenshot Viewः रेग्युलर सर्चमध्ये येणाऱ्या साईट्सचे थेट स्क्रीनशॉट दिसतात.
Video X3 Viewः सर्च स्ट्रिंगसंदर्भातील सर्व व्हिडिओ रिझल्ट्स. हे व्हिडिओ थेट ब्राऊजरमध्ये पाहता येऊ शकतात.
Everyday shopping Viewः अॅमेझॉन, ई-बे, टारगेट आणि वॉलमार्ट या साईटमधील एकत्रित रिझल्ट्स पाहता येतात. म्हणजे तुम्हाला आयफोनच्या किमती पाहायच्या असतील तर आयफोन असा सर्च देऊन एव्हरीडे शॉपिंग व्ह्यू सिलेक्ट करा. चारही शॉपिंग साईटवरील निकाल एकत्रित पाहावयास मिळतील.
Recipe Viewः एव्हरीडे शॉपिंगप्रमाणेच चार रेसिपी साईट्समधील रिझल्ट्स एकत्रित पाहायला मिळतील.
The Weather Viewः एखाद्या शहरातील हवामान पाहण्यासाठी वेदर व्ह्यू सिलेक्ट करा.
Amazon Book Viewः सर्च केलेल्या कीवर्डसंदर्भात जी पुस्तके अाहेत त्यांची अॅमेझॉनवरील सर्व माहिती पाहायला मिळते.
TechCrunch Viewः टेकक्रंच या साईटवर दिलेल्या विषयासंदर्भात जे काही लिहिले असेल ते एकत्रित पाहायला मिळते.
MP3 Search Viewः व्ह्यूझीतील मोस्ट पॉप्युलर फीचर. यात तुम्ही अल्बम आणि आर्टिस्टचे नाव टाकल्यास गाण्यांची यादी डिस्प्ले होते. आणि ती गाणी थेट ब्राऊजरमधूनच प्ले करता येतात. म्हणजे ते गाणं तुम्हाला डाऊनलोड करण्याचीही गरज नाही. एमपीथ्री सर्च व्ह्यू हा एक सुंदर एक्स्पीरियंस आहे.

Related Posts :