आयट्यून्सपासून मुक्ती!
लग्नाच्या तिसऱ्या अॅनिव्हर्सरीला रमेशने कविताला एक सरप्राईझ दिले. अनेक दिवसांपासून तिला हवा असलेला आयपॉड नॅनो त्याने गिफ्ट दिला. त्यामुळे पुढचा आठवडाभर कविता रमेशवर जाम खूश होती. तिने रमेशकडून आयपॉडमध्ये आवडीची सगळी गाणी स्टोअर करून घेतली होती. तिच्या आयपॉडमध्ये जवळ-जवळ ५०० गाणी होती. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एका जुन्या गाण्याच्या मोहात तिने तिचा आयपॉड अॉफिसमधल्या एका सहकाऱ्याच्या कॉम्प्युटरला जोडला...आणि त्यामुळे रमेशच्या लॅपटॉपशी सिंक केलेल्या तिच्या आयपॉडमधली सगळी गाणी इरेझ झाली...तासभर मेहनत घेऊन किमान २० फोल्डर्समधून निवडलेली सगळी गाणी एका क्लिकमध्ये इरेझ झाली. कविताचे अज्ञान आणि तंत्रज्ञानातील मयर्यादा यामुळे तिच्यावर ही सर्व गाणी पुन्हा निवडायची वेळ आली. साहजिकच रमेशवरही तिने चिडचिड केली. पण आता रमेश हुशार झाला होता. कविताने पुन्हा अशी चूक करू नये म्हणून त्याला एक नामी युक्ती सापडली होती...यमीपॉड हे त्या युक्तीचे नाव.
अॅपल अायपॉड कोणत्याही मशीनवर अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला आयट्यून्स हे सॉफ्टवेअर लागते आणि यातील एक मयर्यादा म्हणजे कोणताही आयपॉड केवळ एकाच कॉम्प्युटरशी सिंक्रोनाईझ करता येतो. तो दुसऱ्या कॉम्प्युटरवरून अॅक्सेस करायचा झाल्यास त्यातील सगळी गाणी इरेझ होतात. पण यमीपॉड या छोट्याश्या अॅप्लीकेशनने (यमीपॉड विंडोज, मॅकिन्तोश आणि लिनक्सवर रन होतो) तुमचा आयपॉड कोणत्याही कॉम्प्युटरवरून अॅक्सेस करता येतो. शिवाय गाणीही ट्रान्स्फर करता येतात. यमीपॉड हे अॅप्लीकेशन थेट अायपॉडवर रन होत असल्याने तुमचा आयपॉड कोणत्याही कॉम्प्युटरवरून अॅक्सेस करणं शक्य होतं. यमीपॉड इन्स्टॉल करण्यासाठी पुढील स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो कराः
1. यमीपॉड आयफोन आणि आयपॉड टच वगळता इतर सर्व आयपॉडवर रन करता येते. सर्वप्रथम तुमचा आयपॉड कॉम्प्युटरला कनेक्ट करून आयट्यून्स ओपन करा. त्यानंतर आयपॉडच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Open iTunes when this iPod is attached हा अॉप्शन ‘अनचेक’ व Enable disk use हा अॉप्शन ‘चेक’ करा. सेटिंग्ज सेव्ह करा. यमीपॉडसाठी किमान ४० एमबी एवढी जागा लागते. तेवढी जागा मोकळी करा. पुढे जाण्याअगोदर आयपॉडमध्ये किमान एक तरी गाणे अाहे, याची खात्री करा.
2. आयट्यून्स क्लोज करा. यमीपॉड डाऊनलोड करा. त्यानंतर ड्राईव्हच्या जागी दिसणाऱ्या तुमच्या आयपॉडमध्ये यमीपॉडची अॅप्लीकेशन फाईल ड्रॅग करा. आता आयपॉडमध्ये दिसणाऱ्या यमीपॉडच्या आयकॉनवर क्लिक करून तो इन्स्टॉल करा. लक्षात ठेवा - यमीपॉड आयपॉडवर इन्स्टॉल करायचे आहे, कॉम्प्युटरवर नव्हे.
यमीपॉड तुमच्या आयपॉडचे जनरेशन आपोआप सेट करतो. तसे न झाल्यास ड्रॉपडाऊन मेनूमधून तुमच्या आयपॉडचे जनरेशन सिलेक्ट करा. (उदा. शफल, नॅनो)
3. आता कंडिशन्स अॅक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही यमीपॉडच्या मेन इंटरफेसवर जाल. यात तुमच्या आयपॉडमध्ये स्टोअर असलेली गाणी दिसतील. नवी गाणी अॅड करण्यासाठी कॉम्प्युटरवर असलेल्या फोल्डरमधून थेट ड्रॅग करू शकता.
आता तुमचा आयपॉड आयट्यून्सपासून मुक्त झाला असे समजावे. आता तुम्ही कोणत्याही कॉम्प्युटरला आयपॉड जोडला की त्यात दिसणाऱ्या यमीपॉडच्या आयकॉनवर क्लिक करायचं...
विंडोज, मॅकिन्तोश आणि लिनक्सवर रन होणारे आणखी काही असेच अॅप्लीकेशन्सः
फ्लूला
सॉंगबर्ड
वाचाः आयट्यून्समधून तयार करा रिंगटोन्स
आपण लीहीत असलेली माहीती अतीषय उपयुक्त आहे.
पुढेही अशाच प्रकारे लीहीत रहावे.