डाऊन फॉर यू?
कधी-कधी आपण एखादी साईट ओपन करायला जातो तर कायम काहीतरी एरर मेसेज येतो. कनेक्शन तर व्यवस्थित आहे, साईटचा अॅड्रेसही बरोबर आहे...मग तरी एरर मेसेज का येतोय? मग आपण एक निष्कर्ष काढतो की जाऊ देत, साईट डाऊन असेल. वैतागून असा निष्कर्ष काढणं बरोबर आहे, पण बऱ्याच वेळा साईट अप असते आणि पण आपल्या सेटिंग्जमध्ये काही गोंधळ असल्यामुळे ती ओपन होत नाही. अशा वेळी संबंधित साईट ही डाऊन आहे का अप आहे, हे ठरविण्यासाठी एक अतिशय साधी-सोपी सेवा आहे.
डाऊन फॉर एव्हरीवन अॉर जस्ट मी डॉट कॉम हे त्या सेवेचे नाव. नाव भलं मोठं असलं तरी साईटचे काम मात्र अतिशय सोपे आहे. तुमच्याकडे जी साईट ओपन होत नाहीये तिचा अॅड्रेस टाकला की क्षणार्धात आपल्याला कळतं की ती साईट अप आहे, का डाऊन आहे का अस्तित्त्वातंच नाहीये. एखादी साईट काहीही केल्या ओपन होत नसेल तर आधी एकदा या सेवेचा वापर करून क्रॉस चेक करा आणि मग हवा तो निष्कर्ष काढा.
संडे लाईट्सः
अॉरकुटवरून व्हा अदृश्य!
चेक युवर स्पीड
0 comments »
Post a Comment