चेंज युवर टोन
मोबाईल हा प्रकार जेव्हा नवा होता, तेव्हा हॅंडसेटनंतर रिंगटोन्स हा प्रचंड मोठा आकर्षणाचा भाग होता. तुझ्याकडे कोणत्या रिंगटोन्स आहेत हे पाहण्यासाठी आणि त्या एेकण्यासाठी मित्रांची भांडणं होत असत. मोबाईल हा प्रकार कॉमन होत गेला आणि रिंगटोन्सचे आकर्षणही...असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. रिंगटोन्स आजही तितक्याच पॉप्युलर आहेत. जरा तुमच्या आजूबाजूला पाहा. प्रत्येकाच्या फोनच्या वेगवेगळ्या टोन्स एेकू येतील. कुणाच्या मोबाईलवर भजन वाजतंय, कुणाकडे हिमेश रेशमिया, कुणी पक्ष्यांचा किलबिलाट एेकतोय तर कुणी बासरी. अशा भिन्न रिंगटोन्स एेकल्या की तुम्हालाही पटेल, रिंगटोन्स अजूनही पॉप्युलर आहेत. मग तुम्हीही हळूच ब्लुटूथ अॉन कराल आणि म्हणाल, अरे ती मघाशी वाजलेली बासरीची रिंगटोन पाठव ना मला...अशा रिंगटोन लव्हर्ससाठी एका उत्तम साईटची माहिती मी आज देणार आहे.
ईस्ट लंडनस्थित एका कंपनीने एम-जेली ही सेवा सुरू करून रिंगटोन लव्हर्सची मोठी सोय केली आहे. अनेकवेळा आपण इतरांपेक्षा ‘हटके’ रिंगटोनच्या शोधात असतो. रोज एकच एक टोन एेकून कंटाळा येतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी एम-जेली उत्तम मार्ग आहे. एम-जेलीवर एमपीथ्री फॉरमॅटमधील रिंगटोन्स आणि मेसेज टोन्स उपलब्ध आहेत. यातील जवळपास सर्वच टोन्स मोफत डाऊनलोड करता येतात. या टोन्स तुम्ही थेट तुमच्या मोबाईलवर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी वापरून डाऊनलोड करू शकता. कॉम्प्युटरवर डाऊनलोड करायचे झाल्यास एम-जेली डॉट कॉम एेवजी एम डॉट एम-जेली डॉट कॉम असा अॅड्रेस टाईप करा. आता तुम्ही तुम्हाला हव्या त्या रिंगटोन्स थेट कॉम्प्युटरवर डाऊनलोड करू शकता. या फाईल्स तुम्ही डेटा केबल किंवा ब्लुटूथच्या साह्याने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता. एम-जेलीवर रिंगटोन एेकण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक नसले तरी रजिस्टर्ड मेंबर म्हणून तुम्ही रिंगटोन्सना रेट करू शकता किंवा त्यावर कॉमेंटही देऊ शकता.
अपडेटः रिफ्रेशिंग रिंगटोन्ससाठी अाणखी एक साईट - टोनशेअर्ड
साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर मोबाईलसंदर्भात आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments »
Post a Comment