,

नाऊ डू धिस...

July 29, 2008 Leave a Comment

दिवसभरातील सगळी महत्त्वाची कामं झाली का, असे आठवून पाहत असताना अचानक लक्षात येतं की मुंबईतील एका एजन्सीला दुपारी दोन वाजता फोन करायचा होता. टू-डू लिस्ट्स किंवा स्टिकीनोट्सचा एक तोटा म्हणजे त्यात सगळ्या टास्क्स एकाच वेळी दिसतात. त्यामुळे एकतर दडपण येतं किंवा त्यातील सगळ्यांत सोप्या टास्क्स अगोदर पूर्ण केल्या जाण्याची शक्यता असते. याचा दुसरा अर्थ असा, की दिवसभरातल्या टास्क्सचा प्राधान्यक्रम आपण ठरवलेला नसतो. प्राधन्यक्रम ठरवला नाही तर वर उल्लेख केल्याप्रमाणे इतर कामं होतात, पण महत्त्वाचे काम राहून जाते. असाच काहीचा प्रॉब्लेम जेकब लॉडविक आणि विल्यम कॉटन यांना जाणवत होता. त्यावर त्यांनी एक साधे-सोपे सोल्यूशन काढले. नाऊ डू धिस.

हो, नाऊ डू धिस. हे त्या सोल्यूशनचे नाव. २२ जुलै २००८ रोजी या संकल्पनेचा जन्म झाला. संकल्पना अगदी साध्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. एका वेळी एक काम. पटण्यासारखं आहे हे तत्त्वज्ञान. आपण एका वेळी शंभर कामं करायला जातो आणि तिथेच आपली पंचाईत होते. जेकब आणि विल्यमने एका दिवसात ही संकल्पना नाऊ डू धिस या सेवेद्वारे जगासमोर मांडली आणि दोन दिवसांत सुमारे ६००० लोकांनी त्यांच्या या साईटला भेट दिली आहे.
टास्कलिस्ट एंटर करा

एकेक काम पूर्ण करा

काम पूर्ण झाल्याचा आनंद!

नाऊ डू धिस डॉट कॉमवर तुम्ही तुमची टास्क लिस्ट एंटर करू शकता. त्यानंतर ब्राऊजरच्या एका विंडोत किंवा टॅबमध्ये नाऊ डू धिस ओपन ठेवा. तुम्ही एंटर केलेल्या लिस्टमधील पहिले काम ठळकपणे दिसेल. ते पूर्ण झाल्यास 'डन'वर क्लिक करा. आता तुम्ही एंटर केलेले दुसरे काम ठळकपणे दिसायला लागेल. अशा पद्धतीने सगळी कामे झाल्यानंतर 'अॉल डन' असा मेसेज येईल. हा मेसेज पाहूनच थांबणे, असे दिवसाचे लक्ष्य ठेवले तर कोणतेच काम अपूर्ण राहणार नाही. ही साधी-सोपी वापरून पाहा. तुम्हाला नक्कीच आवडेल.

Related Posts :



1 comments »

  • रुचिरा said:  

    hey amit, mast info aahe. Mala hi info nakkich upyogi padel.