,

रजा-सुट्यांचा अॉनलाईन ताळेबंद

July 30, 2008 Leave a Comment


अश्विनने न सांगता अॉफिसला दांडी मारल्याने त्याचा टीम लीडर प्रचंड संतापला होता. तशात सचिनही दोन दिवस रजेवर असल्याचे लक्षात आल्याने तो स्वतःवरच चिडचिड करू लागला. साहजिक आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत १५-२० जणांची टीम लीड करत असाल तर असा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ताणात आपण रजा-सुट्या या गोष्टी विसरतो आणि मग प्रोजेक्ट्सना उशीर होतो. अशा वेळी एचआर काहीही करू शकत नाही. कारण रजा-सुट्या या अत्यंत वैयक्तिक गोष्टी असतात, आणि त्या आपण आपल्या पातळीवरंच हाताळल्या पाहिजेत. तुमची छोटी कंपनी असेल किंवा तुम्ही एखादी टीम लीड करत असाल तर हूज अॉफ ही अॉनलाईन सेवा तुम्हाला मदत करू शकते.

सध्या जमाना सोशल नेटवर्किंगचा आहे. हूज अॉफ हे आपल्या सहकाऱ्यांचे एकप्रकारचे सोशल नेटवर्कंच असल्यासारखे आहे. याचा उद्देश केवळ रजा-सुट्ट्यांचे नियोजन हा असेल. हूज अॉफवर तुम्ही कितीही मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या रजा-सुट्या मॅनेज करू शकता. आपण लहान उदाहरण घेऊ. समजा तुम्ही २५ जणांची एक टीम लीड करत आहात. हूज अॉफवर तुम्ही अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर तुम्ही तुमच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची नावे अॅड करू शकता. त्यांचा ई-मेल अॅड्रेस हे त्यांचे यूजरनेम असेल. या सहकाऱ्यांना पासवर्ड तुम्ही द्यायचे आहेत. एकदा का सर्व सहकाऱ्यांची नावे डेटाबेसमध्ये अॅड केली की तुम्ही त्यांना वर्षभरात किती सुट्ट्या घेता येतात, एकाच पदावरील दोन व्यक्ती एकाच दिवशी सुटी घेऊ शकतात की नाही, तुमच्या व्यतिरिक्त इतर कोण रजा-सुट्या मंजूर करू शकतात वगैरे माहिती एंटर करायची. तुमचे हूज अॉफ नेटवर्क आता तयार आहे.

आता तुम्ही अॉनलाईन पाहू शकता की आज कोणाची सुटी आहे, कोण रजेवर आहे, कोण केव्हा परत येणार आहे वगैरे. तुमच्या सोबत काम करणारे सहकारीही अॉनलाईन लीव्ह अॅप्लीकेशन देऊ शकतात. ही सेवा इंग्लंडमधील कंपनीने तयार केली असल्यामुळे भारतीय कंपन्यांत बऱ्यापैकी कामास येते. अनेक मोठ्या कंपन्यांत अशा प्रकारची सुविधा तेथील एचआरने उपलब्ध करून दिलेली असते. परंतु लहान आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांत अशी सुविधा सहसा उपलब्ध नसते. अशा कंपन्यांसाठी आणि आंत्रप्रिन्युअर्ससाठी ही सेवा उपयोगास येते.

Related Posts :0 comments »