मॅजिक ट्रान्स्फरची जादू!
क्लाएंटसमोर प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी शैलेशने लॅपटॉप काढला आणि अॉन करण्याचा प्रयत्न केला. तो अॉन झाला नाही. त्याला वाटलं बॅटरी डाऊन असेल. त्याने चार्जर लावून पुन्हा अॉन करण्याचा प्रयत्न केला. तरीही काही झालं नाही. आता मात्र त्याला घाम फुटला. सर्व डेटा, सेटिंग्ज, बुकमार्क, अाऊटलूक मेल्स सारं काही त्यात होतं. आता जर याला काही झालं, तर सगळं संपल्यात जमा होतं. आणि नेमकं तसंच झालं. लॅपटॉप फॉरमॅट करावा लागेल, असं आयटी डिपार्टमेंटने सांगितलं. त्यासाठी किमान दोन दिवस तरी लॅपटॉप त्यांच्याकडे ठेवावा लागणार होता. आता हे दोन दिवस त्याला डेस्कटॉपवर काम करावं लागणार होतं. पण त्याच्याकडील डेटाशिवाय आणि सेटिंग्जशिवाय त्याला काम करणं शक्यच नव्हतं. अशावेळी मॅजिक ट्रान्स्फर हे फ्री सॉफ्टवेअर कामास येतं.
काही कारणानिमित्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉप फॉरमॅट करावा लागला किंवा बदलावा लागला किंवा तुम्ही अॉफिसमध्ये एक आणि घरी एक डेस्कटॉप वापरत असाल तर फाईल्स, ब्राऊजर बुकमार्क, विंडोजमध्ये केलेल्या सेटिंग्ज, महत्त्वाच्या फाईल्स आदी गोष्टी सिंक्रोनाईझ करून ठेवणे केव्हाही चांगले. असे सिंक्रोनायझेशन करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स आणि अॉनलाईन सेवा उपलब्ध आहेत. परंतु त्या वापरण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागते. मॅजिक ट्रान्स्फर हे सॉफ्टवेअर मोफत मिळते.
मॅजिक ट्रान्स्फर इन्स्टॉल केल्यानंतर बॅक-अपवर क्लिक करा. आता तुम्ही सिस्टिम सेटिंग्ज (अॅपिअरंस सेटिंग्ज, माऊस/कीबोर्ड सेटिंग्ज, स्टार्ट मेनू, इ.), आऊटलूक सेटिंग्ज आणि मेल्स, फायरफॉक्स (सेटिंग्ज, बुकमार्क, प्लगईन्स), इंटरनेट एक्सप्लोरर (सेटिंग्ज, फेव्हरेट्स) आणि हार्डडिस्कवरील फाईल्स एका फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता.
त्यानंतर हे बॅकअप फोल्डर एखाद्या सीडी/डीव्हीडीवर किंवा पेनड्राईव्हवर कॉपी करा. या सेटिंग्ज दुसऱ्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वापरण्यासाठी तुम्हाला त्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर अगोदर मॅजिक ट्रान्स्फर इनस्टॉल करायला लागेल. त्यानंतर बॅकअप फोल्डर त्यावर स्टोअर करा. आता मॅजिक ट्रान्स्फरवर क्लिक करून रिस्टोअर म्हणा. तुमच्या सर्व सेटिंग्ज नव्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्षणार्धात रिस्टोअर होतील.
केवळ Windows NT/2000/XP/2003 साठी.
मॅजिक ट्रान्स्फर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments »
Post a Comment