,

क्लिक अॅण्ड कन्व्हर्ट...

August 26, 2008 Leave a Comment

साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या अनेक वाचकांनी अॉडिओ आणि व्हिडीओ कन्व्हर्टरबद्दल विचारणा केली आहे. इंटरनेटवर अनेक अॉनलाईन सेवा (उदा. झमझार) उपलब्ध आहेत. पण प्रोफेशनल्सना डेस्कटॉप कन्व्हर्टर असणे अधिक सोयीचे जाते. याविषयी सर्च केल्यास अनेक अॉडिओ, व्हिडीओ कन्व्हर्टर्स सापडतात, पण त्यातील बरीचशी फ्री नसतात. काहींचे ट्रायल व्हर्जन उपलब्ध असते. काही सेवांमध्ये वेळेची मयर्यादा असते, काहींमध्ये लोगो किंवा डेमो अशी अक्षरे येतात. या सवर्वांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही क्विक मीडिया कन्व्हर्टर वापरून पाहा.परवा इंटरनेटवर यासंदभर्भात सर्च करताना डेलीग्यान या ब्लॉगवर क्विक मीडिया कन्व्हर्टरबद्दल (QMC) माहिती वाचली. अॉडिओ आणि व्हिडीओ कन्व्हर्टर्सचा इंटरफेस साधा आणि सोपा असणे आवश्यक असते. या बाबतीत िक्वक मीडिया कन्व्हर्टर बाजी मारून जातो. िक्वक मीडिया कन्व्हर्टरमध्ये ईझी आणि एक्स्पर्ट असे दोन मोड अाहेत. तुम्हाला कन्व्हर्जनमधील तांत्रिक बाबी समजत नसतील तर तुम्ही ईझी मोड वापरून अॉडिओ किंवा व्हिडीओ कन्व्हर्ट करू शकता. यात फ्रेम रेट, आस्पेक्ट रेश्यो, कोडेक्स आदी पॅरामीटर्स िक्वक मीडिया कन्व्हर्टर स्वतःच ठरवतो. एक्स्पर्ट मोडमध्ये हे पॅरामीटर्स तुम्ही ठरवू शकता.

क्विक मीडिया कन्व्हर्टर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :0 comments »