,

आवाज की दुनिया!

August 27, 2008 Leave a Commentतुमच्यापैकी अनेक जण कॉम्प्युटरवर काही ना काही प्रयोग करत असणार, याची मला खात्री आहे. प्रयोग म्हणजे, एकतर कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअर्स एक्स्प्लोअर करणे किंवा त्यांचा वापर करून काहीतरी क्रिएटिव्ह वर्क तयार करणे. उदा. तुमच्या ट्रिपचा स्लाईडशो तयार करणे किंवा व्हिडीओ एडिट करणे, एखादा नव्या डिझाईनचा ब्लॉग तयार करून पाहणे वगैरे. प्रोफेशनल्सची गोष्ट निराळी असते. नवशिक्यांना निर्मितीचा आनंद अधिक होतो. आता अॉडिओ-व्हिडीओशी संबंधित असे काही प्रयोग करायचे म्हणजे वेगवेगळ्या साऊंड क्लिप्स लागणार. अशा शेकडो क्लिप्स साठवून ठेवणाऱ्या साऊंडस्नॅप या सेवेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

नवशिके आणि प्रोफेशनल्स या दोघांसाठीही साऊंडस्नॅप ही सेवा अतिशय उपयोगी ठरते. सोळा गटांत विभागलेल्या साऊंड क्लिप्स तुम्ही साऊंडस्नॅपवरून डाऊनलोड करू शकता. साऊंडस्नॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे साऊंड लव्हर्सचे एक नेटवर्क आहे. साऊंडस्नॅपचे सदस्य झाल्यानंतर तुम्ही तुमच्याकडील क्लिप्स अपलोड करू शकता.

साऊंडस्नॅपवरील क्लिप्स एमपीथ्री, डब्लूएव्ही आणि इतरही फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. साऊंडस्नॅप लवकरंच पेड मेंबरशीप मॉडेलचा अवलंब करणार असून अपलोड करणाऱ्यांनाही विशिष्ट मोबदला देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे मोफत डाऊनलोड करणाऱ्यांनी आताच साईटवर जाऊन हव्या त्या क्लिप्स डाऊनलोड करून घ्याव्यात.

Related Posts :0 comments »