,

क्रोम शांती क्रोम!

September 5, 2008 Leave a Comment



गुगलच्या क्रोम या नव्या ब्राऊजरबद्दल तुम्ही एव्हाना एेकले किंवा वाचले असेल. विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांनी तर ते वापरूनदेखील पाहिले असेल. गुगल क्रोम लॉंच होऊन आज चार दिवस झाले. माझ्याकडे अॅपल मॅकबुक असल्याने मी अद्याप ते वापरू शकलेलो नाही. मॅकिन्तोश आणि लिनक्ससाठीचे व्हर्जन लवकरात लवकर लॉंच करणार असल्याचे गुगलने कन्फर्म केले आहे. माझ्या ज्या सहकाऱ्यांनी क्रोम वापरून पाहिले आहे, त्यातील बहुतेक सवर्वांच्या पसंतीस ते खरे उतरले आहे. बहुतांश ब्लॉगर्सनेदेखील क्रोमचे भरभरून कौतुक केले आहे. क्रोमच्या बीटा लॉंचमुळे ब्राऊजरमधील स्पधर्धा अधिकच तीव्र होणार, हे स्पष्ट आहे. क्रोमची थेट स्पर्धा इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि मोझिला फायरफॉक्सशी असेल. वेबसर्फरला कमीत कमी कष्टांत अधिक सोयी मिळतील याचा विचार करून सुधारित फायरफॉक्स ३ नुकतेच लॉंच झाले आहे. मायक्रोसॉफ्टनेही इंटरनेट एक्स्प्लोएरर ८ चे बीटा व्हर्जन बाजारात आणले आहे. स्पीड आणि मेमरी युसेज या निकषांवर क्रोम या दोन्ही ब्राऊजर्सना मागे टाकत असल्याचे विविध ब्लॉगर्सने केलेल्या चाचण्यांवरून पुढे आले आहे.



बीटा लॉंच असल्यामुळे अनेक प्रोफेशनल टेक्नॉलॉजी ब्लॉगर्स आणि मीडिया रायटर्स याविषयी उघड भाष्य करीत नाहीयेत. विविध ब्लॉगवर क्रोमबाबत सुरू असलेली चचर्चा अशीः
- विविध अॅड-अॉन्स किंवा एक्स्टेंशन्समुळे फायरफॉक्स आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.
जगातील सुमारे ८० टक्के वेबसर्फर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर वापरतात. या सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यास गुगल क्रोमला निश्चितंच काही कालावधी लागणार. गुगलने सर्च इंजिनच्या स्पधर्धेत याहूला ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने मागे टाकले, त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-बॅक टू बेसिक्स अशा प्रकारचे साधे-सोपे ब्राऊजर असल्याने अधिक वेगाने लोकप्रिय होण्याची शक्यता.
सर्वसामान्य वेबयुजरच्या प्रत्येक टप्प्यावर अापली गरज निमर्माण करणाऱ्या गुगलतफर्फे लवकरच मोबाईल अॉपरेटिंग सिस्टिम (अॅंड्रॉईड) लॉंच केली जाणार आहे. अॅंड्रॉईडच्या माध्यमातून क्रोम अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयफोनलाही धोका संभावतो.

-वेबसर्फरसाठीचे प्रायमरी ब्राऊजर होण्यासाठी अतिशय सिंपल इंटरफेस ही क्रोमची ताकद ठरू शकते आणि त्यापासूनच सवर्वांत मोठा धोकाही संभावतो. First Impression कितीही चांगले असले तरी प्रायमरी ब्राऊजर होण्याइतपत पॉवरफुल फीचर्स गुगल क्रोमच्या बीटा व्हर्जनमध्ये नाहीत.

-हीच बाब टूलबारसाठीही लागू पडते. टूलबार असणे सोयीचे की नसणे, हे फायनल व्हर्जनमध्ये आपल्याला कळेल.

-गुगल क्रोमची जी वैशिष्ट्ये गुगलने हायलाईट केली आहेत त्यातील बहुतेक सर्व वैशिष्ट्ये विविध एक्स्टेंशन्सच्या रूपाने फायरफॉक्समध्ये उपलब्ध आहेत. लाईफहॅकरने याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

गुगल क्रोमबद्दल आणखीही बरेच लिहिले जाईल, टीका होईल, अडचणी समोर येतील. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे बीटा व्हर्जन आहे. त्यामुळे अंतिम व्हर्जन येईपर्यंत ‘क्रोम शांती क्रोम’ एवढेच आपण म्हणू शकतो.
तुमचे गुगल क्रोमबाबत काय मत आहे?

Related Posts :



3 comments »

  • Anonymous said:  

    Dear Abhijit,
    I will check and update you on this.

    Amit Tekale

  • Anonymous said:  

    well.. it's like I thought!