,

अॉनलाईन कीनोट!

September 8, 2008 Leave a Comment



मायक्रोसॉफ्ट अॉफिसप्रमाणे मॅकिन्तोशचे आयवर्क हे सॉफ्टवेअर प्रचलित आहे. आयवर्कमध्ये पेजेस, नंबर्स आणि कीनोट ही तीन अॅप्लीकेशन्स वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचे काम करतात. यातील कीनोट हे अॅप्लीकेशन प्रोफेशनल प्रेझेंटेशन्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कीनोटमध्ये तयार केलेले प्रेझेंटेशन तुम्ही विविध फॉरमॅट्समध्ये (पीपीटी, पीडीएफ, फ्लॅश आदी) एक्स्पोर्ट करून सेव्ह करू शकता. याचा इंटरफेसही पॉवरपॉईंटपेक्षा अधिक सोपा आहे. कीनोटमध्ये प्रेझेंटेशन तयार करणे हा एक सुखद अनुभव असतो. कीनोट हे केवळ मॅकिन्तोश अॉपरेटिंग सिस्टिमवरंच वापरता येते. त्यामुळे विंडोज वापरणाऱ्यांना कीनोटचा अनुभव घेता येत नाही. पण अॅपलमधील दोन सहकाऱ्यांनी स्वतःची कंपनी काढून एक नवी सेवा लॉंच केली आहे. ही सेवा वापरून तुम्हीदेखील कीनोटचा अनुभव घेऊ शकाल.



२८० स्लाईड्स
हे त्या सेवेचे नाव. अॉनलाईन प्रेझेंटेशन टूल्सच्या यादीतली ही तिसरी सेवा. कीनोटशी मिळतीजुळती असल्याने अल्पावधीतच ही सेवा लोकप्रिय झाली. याअगोदर एम्प्रेसर आणि स्लाईडरॉकेट या दोन सेवा अशाच प्रकारचे काम करत होत्या. या सेवांची फारशी चर्चा झाली नाही. २८० स्लाईड्स वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही थेट प्रेझेंटेशन तयार करू शकता. यासाठी अनेक थीम्सही उपलब्ध आहेत. २८० स्लाईड्समध्ये तयार केलेले प्रेझेंटेशन तुम्ही अॉनलाईन स्टोअर करू शकता, स्लाईडशेअरसारख्या साईटवर शेअर करू शकता आणि अॉनलाईन प्रेझेंटही करू शकता. २८० स्लाईड्समध्ये तुम्ही अगोदर तयार केलेले प्रेझेंटेशन्स इम्पोर्ट करून एडिटही करू शकता. कीनोटचा अनुभव घ्यायचा असेल तर २८० स्लाईड्स एकदा वापरून पाहाच!

Related Posts :



0 comments »