,

टीव्ही गाईड हो तो झिप-ए-झॅप हो!

September 9, 2008 Leave a Comment



टीव्ही हो तो बिग टीव्ही हो, अशी जाहिरात करत अनिल धीरूभाई अंबानीने डीटीएचच्या बाजारात प्रवेश केला आहे. सध्या डिश टीव्ही, टाटा स्काय, दूरदर्शन आणि सन टीव्ही या चार डीटीएच सेवा बाजारात आहेत. मोबाईलचा ज्या गतीने प्रसार झाला त्याच गतीने डीटीएचचा भारतात प्रसार होत आहे. त्यामुळे येत्या पाच-दहा वषर्षांत अाणखी काही डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या येऊन येथील १०० टक्के बाजारपेठ काबीज करतील. सर्वसाधारण केबल सेवा आणि डीटीएच यातील प्रमुख फरक म्हणजे िडजीटल क्वालिटी आणि क्विक सव्हर्व्हीस. केबल अॉपरेटर्सकडून या दोन्ही गोष्टींची अपेक्षा ठेवणे म्हणजे...असो. डीटीएचचा आणखी एक फायदा म्हणजे प्रोग्राम गाईड. चॅनेल्सच्या भाऊगर्दीत आपल्याला आवडणारे चॅनेल आणि त्यावरील आवडत्या कार्यक्रमाची वेळ लक्षात ठेवणे कठीण जाते. चॅनेल स्वॅपिंगमध्येच इतका वेळ जातो की एखाद्या वेळेस एखादा चांगला कार्यक्रम मिस होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्या आवडत्या चॅनेलवरील कार्यक्रमाचे ई-मेल किंवा एसएमएस अलर्ट िमळाले तर?



झिप-ए-झॅप या अॉनलाईन टीव्ही गाईडचा वापर करून तुम्ही तब्बल ३०० भारतीय टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमांचे प्रोग्राम गाईड्स पाहू शकता आणि त्यावरील कार्यक्रमांसाठी ई-मेल किंवा एसएमएस अलर्ट मागवू शकता. डीटीएच प्रमाणे या साईटवर चॅनेल्सचे वगर्गीकरण केलेले आहे. तुम्ही या सर्व चॅनेलवरील पुढील सात दिवसांचे कार्यक्रम पाहू शकता. एकाच वेळी इतर चॅनेलवर कोणते कार्यक्रम सुरू असतील याची माहिती मल्टी-चॅनेल ग्रिडमध्ये पाहता येईल. एकावेळी एकच चॅनेलवरील कार्यक्रमांची माहितीही पाहता येते. एक्स्प्लोअरर व्ह्यूमध्ये कॅटेगरीवाईज चॅनेल्सची लिस्ट डिस्प्ले होतात. यावरील विविध सुविधा वापरण्यासाठी अगोदर रजिस्टर व्हावे लागते. रजिस्ट्रेशननंतर तुम्ही आवडते चॅनेल सिलेक्ट करून त्यावरील कार्यक्रमांची लिस्ट पाहू शकता. त्यावरील एखाद्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमावर क्लिक करा. त्यासंदभर्भातील माहिती एका स्वतंत्र विंडोत डिस्प्ले होईल. हा कार्यक्रम तुम्ही फेव्हरेट लिस्टमध्ये अॅड करू शकता किंवा त्यासाठी ई-मेल किंवा एसएमएसवरून अलर्ट मागवू शकता.



(या साईटवरून दिले जाणारे एसएमएस अलर्ट्स मिळण्यात अडचणी येतात, असे माझे निरीक्षण आहे. ई-मेल अलर्ट्स मात्र नियमित मिळतात.)

Related Posts :



0 comments »