,

लाईटवेट मेल

September 10, 2008 Leave a Comment

कधी कधी इंटरनेटची स्पीड इतकी कमी असते की गुगलसुद्धा ओपन होण्यात अडचण येते. अशा वेळी आपल्याला एखादा अर्जंट ई-मेल करायचा असेल तर?जी-मेल ओपन होताना अडचण येत असेल तर तुम्ही बेसिक एचटीएमएल व्ह्यू अॉप्शन सिलेक्ट करू शकता. पण त्याहूनही लाईट अॉप्शन हवा असेल तर तुम्ही जी-मेल मोबाईल ट्राय करू शकता. जी-मेल मोबाईल हे सर्वांत लाईट अॅप्लीकेशन आहे. जी-मेल मोबाईल केवळ मोबाईलवरंच वापरावं असं नाही. तुम्ही कोणत्याही ब्राऊजरमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करू शकता. त्यासाठी http://m.gmail.com यावर क्लिक करा. तुम्ही एक स्वतंत्र विंडोमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करून ठेवू शकता. याच पद्धतीने तुम्ही याहू मेल (m.yahoo.com), एमएसएन मेल (mobile.msn.com) आदी सहजरित्या वापरू शकता. मोबाईलवर आणि पीसीवरदेखील!

Related Posts :0 comments »