एज्युकेशनल ट्विटरः एडमोडो

September 11, 2008 Leave a Comment



तुमच्यापैकी अनेक जण ट्विटर वापरत असतील. ट्विटर म्हणजे आता, या क्षणी तुम्ही काय करत आहात किंवा काय विचार करत आहात हे इतरांना सांगणे. वेब २.०च्या भाषेत याला मायक्रोब्लॉगिंग असे म्हणतात. मायक्रोब्लॉगिंगसाठी अनेक सेवा आहेत; पण ट्विटरसारखा प्रतिसाद इतर कोणत्याही सेवेस मिळाला नाही. जुलै २००८ अखेर सुमारे २२ लाख लोकांना ट्विटरवर आपले अकाऊंट क्रिएट केलेले आहे. ट्विटरवरून प्रेरणा घेऊन अमेरिकेतील जेफरी ओ’हारा याने शिक्षक आणि विद्याथ्यर्थ्यांना उपयोगास येईल असा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तयार केला आहे.



एडमोडो हे या प्लॅटफॉर्मचे नाव. याची तुलना ट्विटरशी होत असली तरी, यातील सोयी-सुविधा ट्विटरहून अधिक चांगल्या आहेत. ट्विटरचा वापर करून तुम्ही केवळ १४० कॅरेक्टर्समध्येच मेसेज पाठवू शकता. एडमोडोमध्ये मेसेज, नोट्ससह फाईलही शेअर करता येतात. एडमोडोवर तुम्ही शिक्षक किंवा विद्याथर्थी म्हणून रजिस्टर होऊ शकता. एडमोडोवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही एखादा नवा ग्रुप (उदा. क्लास अॉफ २००८ किंवा फायनान्स) तयार करू शकता. ग्रुप तयार केल्यानंतर त्या ग्रुपसाठी एक युनिक कोड तयार होतो (उदा. xyz123). हा कोड वापरून तुम्ही इतरांना हा ग्रुप जॉईन करण्यास सांगू शकता. एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुपला अलर्ट, नोट्स, लिंक्स, फाईल्स, असाईनमेंट्स, इव्हेंट्स, डायरेक्ट मेसेजेस आदी सर्व गोष्टी तुम्ही एडमोडोवरून पाठवू शकता. काही असाईनमेंट्स किंवा फाईल्स अधिक काळासाठी स्टोअर करून ठेवायच्या असतील तर तुम्ही लॉकर ही सेवा वापरून स्टोअर करू शकता. आजकाल विद्याथर्थी आणि शिक्षकदेखील अॉरकुट, फेसबुक, लिंक्डइन अादी सोशल नेटवर्किंग साईट्सवरून एकमेकांशी संपर्क ठेवून असतात. पण वेब २.०चा अभ्यास आणि नॉलेज शेअरिंगसाठी अधिकाधिक फायदा करून घ्यायचा असेल तर एडमोडो वापरून पाहायलाच हवे.

Related Posts :



0 comments »