कमर्शियल ट्विटर: यामर

September 12, 2008 Leave a Commentशिक्षक आणि विद्याथ्यर्थ्यांसाठी तयार केलेल्या एडमोडो या सेवेबद्दल मी कालच्या पोस्टमध्ये माहिती दिली होती. संबंधितांना त्याचा फायदा नक्कीच होईल. इनोवेटिव्ह टेक्नॉलॉजी कन्सेप्ट्सना आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी टेकक्रंच या साईटतरफे भरवल्या जाणाऱ्या टेकक्रंच ५० या परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी ५२ स्पर्धकांमध्ये यामर या नव्या सेवेस पहिले बक्षीस मिळाले. ट्विटर विथ बिझनेस मॉडेल - असे टेकक्रंचने यामरचे वर्णन केले आहे.एडमोडोप्रमाणेच यामरदेखील अतिशय फोकस्ड सेवा आहे. यामर ही सेवा एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी तयार केली आहे. What are you doing? असे ट्विटर विचारत असेल तर What are you working on? असे यामर विचारतो. तुम्ही आता काय काम करत आहात याची ताजी माहिती त्याच प्रोजेक्टवर काम करणाऱ्या इतरांना तसेच तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मिळण्यासाठी यामर उपयोगी ठरते. यामर तयार करणाऱ्यांनी इंटर्नल कम्युनिकेशनसाठी ही शक्कल लढवली होती. पण या कल्पनेत दम आहे हे ओळखून कंपनीच्या मालकाने यामर नावानेच नवी कंपनी काढली व टेकक्रंच ५० मध्ये यामरचे बीटा व्हर्जन लॉंच केले. यामरवर रजिस्टर होण्यासाठी तुमच्याकडे कंपनीचा ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे (उदा. yourname@yourcompany.com). रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही कंपनीतील इतर सहकाऱ्यांना इन्व्हाईट्स पाठवू शकता. तुमच्या नेटवर्कमधील सहकाऱ्यांचे मेसेजेस यामरच्या पेजवर तुम्ही पाहू शकाल. विशिष्ट सहकाऱ्यांना तुम्ही फॉलोही करू शकाल. तुम्हाला मेसेजेस पोस्ट करायचे असतील तर तुम्ही जी-टॉक, एम किंवा जॅबरवरूनही पोस्ट करू शकाल. अमेरिकेतील ठराविक मोबाईल कंपन्यांची सेवा वापरणाऱ्यांना एसएमएसवरूनही मेसेजेस पाठवता येऊ शकतात. यामरवरील मेसेजेस डिलीट करायचे असतील किंवा काही सदस्यांना काढून टाकायचे असेल तर तुम्हाला विशेष अॅडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स मिळवावे लागतात. यात यामरचे बिझनेस मॉडेल दडलेले आहे. यामरवरील एखाद्या कंपनीचे अकाऊंट क्लेम करायचे असतील तर त्या कंपनीस प्रत्येक सदस्यामागे दरमहा १ डॉलर इतका आकार भरावा लागतो. म्हणजे तुमच्या कंपनीत ५०० कर्मचारी असतील तर तुम्हाला दरमहा ५०० डॉलर खर्च येईल. विशेष राईट्स नको असतील तर ही सेवा विनामूल्य वापरता येते.

Related Posts :1 comments »

  • real.nep said:  

    this is really good blog . keep it up .
    visit ma blog
    www.ekdumjhutha.blogspot.com
    wanna exchange link contect me on ma blog