कडू की गोड? इट्स अप टू यू!

September 13, 2008 Leave a Comment



इंटरनेटची निर्मिती सोशल नेटवर्किंग आणि सोशल शेअरिंगसाठीच झाली होती की काय, असा प्रश्न पडावा इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया साईट्स तयार होत आहेत. वेब २.० या संकल्पनेचा आधार घेऊन लोकांना एंगेज कसं ठेवता येईल आणि त्यातून पैसा कसा मिळवता येईल, यासाठी जगभरातील नवउद्योजक अहोरात्र श्रम घेत आहेत. त्यातून अनेक नव्या साईट्स उदयास येत आहेत. यातील सर्वच साईट्स लोकप्रिय होतात असे नाही. मोजक्याच कल्पना लोकांच्या पसंतीस उतरतात. फेसबुक, अॉरकुट, मायस्पेस आदी साईट्सबद्दल तुम्हाला माहिती असेलच. पिकासा, फ्लिकरही माहित असतील. यू सेन्ड इट, ड्रॉपआयओ, विकिसेन्ड आदी फाईल शेअरिंग साईट्सही परिचयाच्या असतील. जी-मेल, याहू, एमएसएनही तुम्ही वापरत असाल. शिवाय ट्विटर, पौन्सही माहित असतील. या सगळ्या साईट्सची काही वैशिष्ट्ये आहेत. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या सेवेसाठी आपण त्या साईट्स वापरतो. उदा. फोटो शेअरिंगसाठी फ्लिकर, नेटवर्किंगसाठी फेसबुक वगैरे. अशा सगळ्या सोशल सवर्व्हीसेस एका छत्राखाली आणल्या तर?



कादू (Kadoo) (उच्चार योग्य नसल्यास कृपया कळवावे) ही अशाच प्रकारची एक सेवा. डेमोफॉल०८ या परिषदेत आठ तारखेस कादूची सेवा लॉंच करण्यात आली. कादू म्हणजे अॉल-इन-वन सोशल मीडिया साईट. कादूवर रजिस्टर झाल्यानंतर तुमच्या युजरनेमने तुमची पब्लिक स्पेस तयार होते (उदा. username.kadoo.com). याच नावाने तुमचा ई-मेल आयडीदेखील तयार होतो (username@kadoo.com). कादूवर तुम्ही तुमच्या मित्रांचे, सहकाऱ्यांचे, फॅमिली मेंबर्सचे नेटवर्क तयार करू शकता. कादूचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे तुम्ही यावरून कोणत्याही प्रकारचा डिजिटल कन्टेन्ट शेअर करू शकता. कादूवर १० जीबी क्षमतेपर्यंतचा कन्टेन्ट शेअर करणे शक्य आहे. हा कन्टेन्ट तुम्ही तुम्हाला हव्या त्या व्यक्तीसोबत किंवा ग्रुपसोबत शेअर करू शकता. कादूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या मित्रांना तुमचे बिझनेस-ओरिएंटेड प्रोफाईल दिसेल; तर वर्गमित्रांना वेगळे प्रोफाईल दिसेल. कादूचा वापर करून तुम्ही ई-मेलचीही देवाणघेवाण करू शकता. कादूबाबत आताच फार लिहिणे योग्य होणार नाही. मी अजूनही यातील विविध फीचर्स एक्स्प्लोअर करतोय. तुम्हीपण कादूबद्दलचे तुमचे कडू-गोड अनुभव येथे शेअर करू शकता.

Related Posts :