,

बडे मियॉं, छोटे मियॉं!

September 20, 2008 Leave a Comment

यूआरएल शॉर्टनिंग सेवेबद्दल तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही या सेवा वापरतही असाल. एखादी भलीमोठी लिंक दुसऱ्याला पाठवण्यापेक्षा २०-२५ कॅरेक्टर्समधली छोटी लिंक पाठवणे केव्हाही सोपं. या सेवेचा जो फायदा आहे त्याचा गैरफायदाही अनेक जण घेऊ शकतात. शॉर्ट केलेल्या यूआरएलवरून तुम्ही कोणत्या साईटवर जाणार आहात याचा कोणताही पत्ता लागत नाही. अशावेळी तुम्ही एखाद्या पोर्न साईटवर किंवा तुमच्या कॉम्प्यूटरला घातक ठरेल अशा एखाद्या साईटवर रिडायरेक्ट होण्याची शक्यता असते. यावर उपाय काय?



नेमका हाच प्रश्न डोक्यात ठेवून लॉंग यूआरएल ही सेवा तयार करण्यात आली. या प्रश्नावरचे उत्तर म्हणजे शॉर्ट यूआरएल डिकोड करून पाहणे. अथर्थात मूळ यूआरएल पाहणे. तुमच्या जवळच्या मित्राने किंवा सहकाऱ्याने पाठवलेली यूआरएल आक्षेपार्ह नसेल, पण अनोळखी ई-मेलवरून आलेली यूआरएल किंवा एखाद्या ब्लॉगवरील यूअारएल क्रॉसचेक करण्यासाठी आपण लॉंग यूआरएल वापरू शकतो. उदा. एखाद्याने तुम्हाला http://is.gd/w अशी यूअारएल पाठवली. या शॉर्ट यूआरएलची मूळ लिंक कोणती आहे हे पाहण्यासाठी तुम्ही ही यूआरएल लॉंग यूआरएलच्या बॉक्समध्ये पेस्ट करा. एक्स्पान्डवर क्लिक करून तुम्ही याची मूळ लिंक http://google.com ही आहे हे पाहू शकता. खात्री झाल्यानंतर तुम्ही संबंधित साईटवर जाऊ शकता.

यूअारएल शॉर्टनिंग सेवेसंबंधी अधिक माहितीसाठी वाचाः शॉर्ट अॅंड स्वीट

Related Posts :



0 comments »