,

अॉनलाईन बिग बॉस!

September 22, 2008 Leave a Comment



कलर्स या नव्या चॅनेलवर सुरू झालेल्या बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनला भारतीयांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. शिल्पा शेट्टी होस्ट करत असलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये एक से बढकर एक दिग्गजांची वणर्णी लागली आहे. जेड गुडी (कॅन्सरचे निदान झाल्यामुळे जेडला पहिल्या आठवड्यातच बाहेर जावे लागले), मोनिका बेदी, राहुल महाजन, संजय निरूपम अशा वादग्रस्त व्यक्तीमत्त्वांच्या प्रवेशामुळे या सीझनची उत्सुकता अाणखी वाढली. आता माजी Miss World डायना हेडनने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. अजून दोन महिन्यांचा खेळ शिल्लक असल्याने प्रेक्षकांची चांगलीच करमणूक होणार आहे. असे रिअॅलिटी शोज बघताना कधी कंटाळा येतो. वाटतं, यांच्या आयुष्यात काय चाललंय हे आपण का पाहायचं? अशा स्पधर्धांमध्ये आपण सहजा-सहजी प्रवेश तर मिळवू शकत नाही, मग पाहून तरी आनंद घेऊ शकतो. पण असाच खेळ तुम्हीदेखील खेळू शकला तर?



तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? पण हे शक्य आहे. असाच खेळ तुम्ही घरबसल्या खेळू शकता ते देखील खऱ्याखुऱ्या मित्रांसोबत. टेन्गेज्ड (Ten + Engaged = Tengaged) ही सेवा म्हणजे अॉनलाईन बिग ब्रदर (किंवा बिग बॉस). तुम्हाला बिग बॉसची संकल्पना माहित असेल तर टेन्गेज्ड खेळणे अत्यंत सोपे आहे. टेन्गेज्डवर रजिस्टर होण्यापूवर्वी तुम्हाला तुमचा अवतार तयार करावा लागतो. अवतार तयार केल्यानंतर काही क्षणांत तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते. टेन्गेज्डवर एकावेळी अनेक बिग बॉस हाऊसेस तयार होत असतात. प्रत्येक हाऊसमध्ये १० व्यक्ती असतात. या हाऊसला विशिष्ट क्रमांक (उदा. कास्टिंग #7203) दिलेले असतात. यास हाऊसच्या एेवची कास्टिंग म्हटले जाते. एक खेळ ७ दिवसांचा असतो. यात तुम्ही तुमच्या हाऊसमधील इतर व्यक्तींशी अॉनलाईन संवाद साधायचा असतो. दररोज एक व्यक्ती संबंधित हाऊसमधून बाहेर जाते. नॉमिनेशन झाल्यानंतर या साईटवर येणारी कोणतीही व्यक्ती तुम्हाला मत देऊन वाचवू शकते. तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू करून तुमची मतंही मांडू शकता. बिग बॉसप्रमाणेच यातही तुम्ही किती अॅक्टिव्ह आहात आणि इतरांशी कसे संबंध ठेवता यावर तुमचे यश अवलंबून असते. यात अनेक नव्या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. उदा. इतरांना टेन्गेज्डचे इन्व्हिटेशन पाठवल्यानंतर तुमचे Karma पॉईंट्स वाढत जातात व तुम्ही वरच्या लेव्हलचे टेन्गेज्ड खेळण्यास पात्र होता. तुमचा रोजचा सहभाग, पोस्ट्स, कॉमेंट्स यामुळे तुम्हाला टेन्गेज्ड डॉलर्स मिळतात. यांचा वापर करून तुम्ही काही विशिष्ट पॉवर प्राप्त करू शकता. तुम्ही बिग बॉसचे फॅन असाल तर हा खेळ एकदा खेळून पाहाच!

Related Posts :



0 comments »