‘एनजूबा’संगे हवे ते शोधा

September 19, 2008 Leave a Commentयाहूने कितीही बदल केले, एमएसएनने विंडोज लाईव्हमध्ये नवे फीचर्स अॅड केले तरी सर्च करण्यासाठी आपण गुगलशिवाय इतर कोणत्याही साईटवर विसंबून राहत नाही. सर्च सॅटिसफॅक्शन केवळ गुगलच देऊ शकते. असो. असे म्हटले तरी नवउद्योजकांनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. नव्या कल्पनांसह नवीन सर्च इंजिन लॉंच होतच राहतात. हाकिया असो किंवा स्कोअर असो किंवा आताचे एनजूबा...प्रयत्न सुरूच आहेत. एनजूबा बद्दल आज माहिती घेऊयात.

गुगलचे अनेक प्रॉडक्ट्स अाहेत. सर्चमध्येही अनेक कॅटेगरीज आहेत. पण टेक्स्ट आणि इमेज सर्चचाच वापर प्रामुख्याने केला जातो. एनजूबामध्ये तुम्ही टेक्स्ट, इमेजेस, व्हिडीओ, एमपीथ्री, एफटीपी, बुक्स, रॅपिडशेअरवरील फाईल्स आणि टोरेन्ट्सही सर्च करू शकता. थोडक्यात तुमच्यासाठी सर्च सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा वगर्गीकरणामुळे तुम्हाला नेमकं काय शोधायचं आहे, हे माहित असेल तर अपेक्षित रिझल्ट मिळण्यास कमी वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला स्टीफन हॉकिंगनं लिहिलेले पुस्तक हवंय आणि तुम्ही गुगलमध्ये A brief history of time (स्टीफन हॉकिंग यांचे गाजलेले पुस्तक) असा सर्च दिल्यास त्या पुस्तकाबद्दलची माहिती, त्याचे विकिपेडियावरील पेज, परीक्षण अादी गोष्टी डिस्प्ले होतील. पण एनजूबामधील बुक्स सेक्शनमध्ये जाऊन हाच सर्च दिल्यास पीडीएफ फॉरमॅटमध्ये थेट पुस्तकच उपलब्ध होईल.
Results for A brief history of time on GoogleResults for A brief history of time on Njouba


सर्चसाठी वापरली जाणारी टेक्नॉलॉजी सारखी असली, मिळणारे रिझल्ट्सही तेच असले तरी ते किती रिलेव्हंट अाहेत आणि किती लवकर मिळतात यावर त्या सर्च इंजिनची लोकप्रियता अवलंबून असते. लोकप्रियता आणि युजेबिलीटी यात गुगलचा हात धरणे अशक्य असले तरी नवउद्योजकांच्या प्रयत्न एकदा अनुभवून पाहण्यास काय हरकत आहे?

Related Posts :2 comments »

  • savli said:  

    tumchya comuterchya jagat mi agadi "dha"aahe mhanalat tari chalel..mi generally ashi english madhe marathi lihite..mala devnagrimadhe lihayala aawadate..khup try kela nahich jamle..kase lihu sangu shakal?

  • Amit Tekale said:  

    Hello Savli,
    Writing in Devnagari requires little practice. You can try this is blogger. Use Devnagari in blogger to practice. Try copying some news or posts from Marathi blogs. Try this for at least 2 to 3 weeks.