मस्ट वॉच - डाऊनलोडः द ट्रू स्टोरी अॉफ इंटरनेट

September 23, 2008 Leave a Comment

जगातील पहिले ब्राऊजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेटस्केप नेव्हिगेटरला झोपवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने कोणती स्ट्रॅटेजी वापरली आणि कंपनीच्या चारित्र्यावर डाग लागू नये म्हणून गुगलने ‘डोन्ट बी इव्हिल’ असे घोषवाक्य का निवडले यासंबंधीची उत्कंठावर्धक माहिती तुम्ही डिस्कव्हरी चॅनेलवर (भारतात) दर सोमवारी रात्री ९.०० वाजता ‘डाऊनलोडः द ट्रू स्टोरी अॉफ इंटरनेट’ या नव्या मालिकेत पाहू शकता. कालपर्यंत याचे तीन एपिसोड्स टेलिकास्ट झाले आहेत.

इंटरनेटमध्ये झालेल्या क्रांतीचा उगम अमेरिकेतून झाला. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ईबे, अॅमेझॉन, नेटस्केप, फेसबुक, मायस्पेस आदी कंपन्या आणि वेब प्रॉपटर्टीज या क्रांतीचे जनक ठरले. गेल्या दहा वषर्षांत या क्षेत्रात प्रचंड वेगाने बदल झाले आणि २०-२२ वषर्षांचे नवउद्योजक रातोरात कोट्यधीश झाले. गुगलचे निर्माते लॅरी पेज आणि सजर्जी ब्रिन हे त्यापैकीच. हे सर्व बदल प्रामुख्याने सिलिकॉन व्हॅलीत घडले आणि टेक्नॉलॉजी जर्नलिस्ट जॉन हीलमन त्यातील बहुतांश बदलाचे साक्षीदार आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील अनेक दिग्गजांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या बदलांमागे घडलेले कथानक त्यांनी डाऊनलोड या मालिकेत उलगडले आहे.


अमेरिका आणि युरोपमध्ये गेल्या मार्चमध्ये ही मालिका अगोदरच दाखविण्यात आली आहे. भारतात दोन आठवड्यांपूर्वी ती दाखवण्यास सुरवात झाली. पहिल्या भागात ब्राऊजर वॉर आणि दुसऱ्या भागात सर्च वॉर यासंबंधी माहिती दाखवण्यात आली. तुम्हालाही बदलांमागचे कथानक जाणून घ्यायचे असतील तर चुकवू नये अशी ही मालिका आहे.
Search Wars (Episode 1): Tuesday, 23 sept, 10.00 am
Ebay/Amazon (Episode 3): Wednesday, 24 sept 3.00 pm
Ebay/Amazon (Episode 3): Saturday, 27 sept 12.00 noon
Ebay/Amazon (Episode 3): Saturday, 27 sept 11.00 pm

या कार्यक्रमांचे ई-मेल अलर्ट मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :



0 comments »