,

फास्ट, स्मार्ट आणि सेफः ओपनडीएनएस

September 24, 2008 Leave a Comment

इंटरनेट आणि स्पीड यांचे सूत कधीच जुळत नाही. घरात ब्रॉडबॅंड घेऊनसुद्धा इंटरनेट स्लो झाल्याच्या तक्रारी अनेक जण करत असतात. अॉफिसमध्ये शक्यतो लॅनचा वापर केला जात असल्याने इफेक्टीव स्पीड कमीच असते. त्यात काही गडबड-गोंधळ झाल्यास गुगल ओपन होण्यासदेखील प्रचंड वेळ लागू शकतो. घरात लहान मुलं असल्यास त्यांना अॅडल्ट साईटपासून दूर कसे ठेवायचे हा एक मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. याखेरीज वाढत्या अॉनलाईन फ्रॉड्सचा प्रश्न आहेच. आता तुम्ही म्हणाल, एवढे प्रॉब्लेम्स असतील तर इंटरनेट वापरायचेच कशाला. पण इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पना करणेच अशक्य आहे. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांनीच या प्रॉब्लेम्सवर सोल्यूशनदेखील उपलब्ध करून दिले आहे. आजच्या पोस्टमध्ये स्पीड आणि सेफ्टीची हमी देणाऱ्या ओपनडीएनस या सेवेबद्दल माहिती घेऊयात.

डीएनएस अथर्थात डोमेन नेम सर्वर हा एखाद्या डोमेन नेमला अायपी अॅड्रेसमध्ये रुपांतरित करतो. आपण जेव्हा-जेव्हा एखादी साईट ओपन करतो किंवा एखादा मेल पाठवतो तेव्हा आपण डीएनएसला हिट करत असतो. अशा अब्जावधी हिट्स विविध डीएनएसला दररोज मिळत असतात. एखादी साईट अत्यंत फास्ट लोड होण्यासाठी दोन गोष्टींची गरज असतेः १. तुमच्या कॉम्प्युटरची कॅश मेमरी जबरदस्त पाहिजे आणि २. नेटवर्क स्पीड चांगली असली पाहिजे. ओपनडीएनएसमध्ये या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली गेली आहे. तांत्रिक भाषा कळत नसल्यास मी उदाहरणासह सांगतोः
ओपनडीएनएस वापरण्यापूवर्वी www.washingtonpost.com ओपन होण्यास ८८ सेकंद लागत होते. ओपनडीएनएसनंतर (कॅश क्लिअर करून) हीच साईट १७.८ सेकंदात ओपन झाली! ओपनडीएनएसचा नेमका फायदा काय याची आता तुम्हाला कल्पना आली असेल. तुमच्या नेटवर्कवर जी साईट ओपन होण्यास प्रचंड वेळ लागतो ती साईट ओपनडीएनएस वापरून ओपन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फरक आपोआप कळेल.अोपनडीएनएसचा दुसरा फायदा म्हणजे याद्वारे तुम्ही कस्टमाईझ्ड साईट फिल्टर्स (उदा. अॅडल्ट फिल्टर, फिशिंग फिल्टर) तयार करू शकता. अोपनडीएनएस वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागत नाही. डीएनएस सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही वापरत असलेल्या डीएनएसएेवजी ओपनडीएनएसनेचे डीएनएस वापरायचे आहेत. विंडोज, अॅपल, लिनक्स आणि पाम अशा सर्व अॉपरेटिंग सिस्टिमवर तुम्ही ओपनडीएनएस वापरू शकता. तुमचे स्वतःचे अॉफिस असेल तर तुम्ही राऊटर किंवा थेट डीएनएस सर्व्र्वरमध्ये ओपनडीएनएस वापरू शकता. अोपनडीएनएस सुरक्षित असल्याची हमी कंपनीने दिली आहे.

Related Posts :1 comments »

 • caba said:  

  कैसे गूगल डीएनएस सेटिंग्स? गूगल DNS सर्वर पते, क्या?
  गूगल, के रूप में नया डीएनएस भाषण के दौरान इस प्रकार है;
  8.8.8.8
  4.2.2.5
  8.8.4.4
  http://www.cabadak.com/google-dns-ayarlari-nasil-yapilir/