,

असा मी सर्चमी

September 25, 2008 Leave a Comment

हाकिया, व्ह्यूझी, स्पेसटाईम या काही व्हिज्युअल सर्च इंजिनबाबत आपण गेल्या काही पोस्ट्समध्ये माहिती घेतली आहे. व्हिज्युअल सर्च इंजिन्सच्या गदर्दीत गेल्या मार्चमध्ये सर्चमी नावाचे एक नवे इंजिन लॉंच झाले होते. आणखी एक सर्च इंजिन? पुरे आता. गुगलची सर कोणालाही येणार नाही. पण सर्चमीने जूनमध्ये सर्च स्टॅक ही संकल्पना पुढे आणली आणि सर्च आणि शेअरिंग या दोन्ही गोष्टी व्हिज्युअली इंटिग्रेट केल्या. हा अनुभव नक्कीच चांगला आहे. आता गेल्या आठवड्यात सर्चमीने मोबाईलसाठी पहिले व्हिज्युअल सर्च इंजिन लॉंच केले आहे.

सर्चमी: रिझल्ट पेज


सर्चमीचा इंटरफेस अत्यंत सोपा आणि आल्हाददायक आहे. तुम्ही एखादा कीवर्ड एंटर केला की त्याचे रिझल्ट्स स्टॅक स्वरूपात तुमच्या समोर येतात. स्टॅकखाली असलेला स्क्रोल कंट्रोल वापरून तुम्ही पुढचे रिझल्ट्स पाहू शकता. सर्चमीचे वैशिष्ट्य केवळ एवढ्यावर थांबत नाही. स्क्रीनवर उजव्या बाजूस स्टॅक नावाचे अॉप्शन असेल. त्यात न्यू स्टॅकवर क्लिक केल्यास तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर स्टॅक स्टोअर करून ठेवू शकता. सर्चमीची ही बीटा अावृत्ती असल्याने सध्या हे स्टॅक तुमच्या कॅश मेमरीत स्टोअर होतात. त्यामुळे कॅश क्लिअर केल्यास तुमचे स्टॅकही क्लिअर होतील. सर्व युजर्सचे स्टॅक सेन्ट्रल डेटाबेसमध्ये लवकरच स्टोअर केले जातील, अशी खात्री सर्चमीने दिली आहे. असो. तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत आहात आणि सर्चमीचा आधार घेऊन काही चांगल्या साईट्सची माहिती गोळा केली आहे, असे आपण समजूया. सर्चमीच्या रिझल्टपेजमधील कोणतेही पेज तुम्ही ड्रॅग करून नव्याने तयार केलेल्या स्टॅकमध्ये ड्रॉप करू शकता. असे अनेक स्टॅक्स तुम्ही स्टोअर, ई-मेल आणि ब्लॉग किंवा साईटवर शेअरही करू शकता.

सर्चमीः स्टॅक्स


मोबाईलवरून अॅक्सेस करण्यासाठी m.searchme.com असे टाईप करा. मोबाईलवर सर्चमी अॅक्सेस करण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला अपेक्षित साईटचे नाव आणि होमपेजचा स्क्रीनशॉट थेट रिझल्टमध्ये डिस्प्ले केला जातो. त्यामुळे त्या साईटवर जाऊन ती साईट ओपन होण्याची वाट पाहावी लागत नाही. मोबाईल अॅक्सेस असणारे सर्चमी हे पहिले व्हिज्युअल सर्च इंजिन आहे.

SearchMe company profile provided by TradeVibes

Related Posts :0 comments »