,

जी-मेलमध्ये इमेज कशी प्लेस कराल?

September 26, 2008 Leave a Comment

तुम्हाला अनेक फॉरवर्ड ई-मेल्स येत असतील. फॉरवर्ड ई-मेल्समध्ये अनेकदा इमेजेस असतात. जी-मेलवरून असे मेल पाहताना Display Images Below असा अॉप्शन येतो. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्या मेलसोबत अालेल्या इमेजेस पाहू शकतो. या इमेजेस अॅटॅचमेंट स्वरूपात आलेल्या नसतात. त्या मेलमध्येच एम्बेड केलेल्या असतात. जी-मेलमध्ये एचटीएमएल फॉरमॅटिंगचा अॉप्शन नसल्याने तुम्हाला डेस्कटॉपवर असणाऱ्या इमेजेस थेट मेल बॉडीमध्ये प्लेस करता येत नाहीत. पण एक सोपी ट्रिक वापरून तुम्ही हे साध्य करू शकता.

तुम्ही आऊटलूक किंवा तत्सम डेस्कटॉप मेल क्लाएंट वापरत असाल आणि त्यावर कोणतेही मेल अकाऊंट Configure केलेले असेल तर तुम्ही थेट बॉडीमध्ये इमेजेस प्लेस करू शकता. कारण अशा क्लाएंट्समध्ये एचटीएमएल अॉप्शन असतो. अथर्थात यासाठी हा अॉप्शन अॅक्टीव्ह असायला हवा.

डेस्कटॉपवरील एखादी एमेज जी-मेलच्या बॉडीमध्ये प्लेस करायची असल्यास सर्वप्रथम तुम्हाला ती एखाद्या इमेज-होस्टिंग साईटवर होस्ट करावी लागेल. उदा. इमेजशॅक किंवा पिकासा वेब अल्बम. इमेज होस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची एक लिंक मिळेल. ही लिंक दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करा. तुम्ही अपलोड केलेली इमेज डिस्प्ले होईल. आता ही इमेज थेट जी-मेलच्या कॉम्पोझ बॉक्समध्ये ड्रॅग करा. दुसऱ्या विंडोएेवजी दुसऱ्या टॅबमध्ये इमेज ओपन केल्यास Ctrl-A करून नंतर Ctrl-C (अर्थात सिलेक्ट अॉल आणि कॉपी) करावे. आता कॉम्पोझ बॉक्समध्ये ज्या ठिकाणी इमेज प्लेस करायची आहे तेथे कर्सर नेऊन Ctrl-V (पेस्ट) करावे.यावरून एक लक्षात येईल की जी-मेलच्या कॉम्पोझ बॉक्समध्ये वेबवर असलेली कोणतीही इमेज प्लेस करता येते. त्यामुळे इतर साईटवरील इमेज प्लेस करायची असल्यास ती डेस्कटॉपवर सेव्ह न करता थेट कॉम्पोझ बॉक्समध्ये ड्रॅग करावी. कॉम्पोझ बॉक्समध्ये इमेज प्लेस केल्यानंतर इमेज रिसाईझचे अॉप्शनही तुम्हाला पाहायला मिळतील.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे वाचक अनिकेत वैद्य यांनी आणखी एका ट्रिकचा उल्लेख केला आहे. ती अशीः
गुगल डॉक्समध्ये जाऊन नवे डॉक्युमेंट क्रिएट करा. मेनूबारमधून इन्सर्ट > पिक्चर सिलेक्ट करून इमेज अॅड करा. इथे प्लेस केलेली इमेज Ctrl-A करून सिलेक्ट करा व जी-मेल कॉम्पोझ बॉक्समध्ये प्लेस करा.Related Posts :2 comments »

  • aniket vaidya said:  

    There is another option for this. We can use google documents. In documents we can insert image as like in outlook. (size limit is 2mb)
    then copy from google documents (select all ctrl+a) and paste in gmail.

  • Amit Tekale said:  

    Thanks Aniket. Your tip has been added to the post...